राहाता तालुक्यातील प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि उपाध्यक्षपदी सोपान शिरसाठ यांची एकमताने निवड करण्यात आली.
कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडीसाठी नवीन संचालकांची विशेष बैठक निवडणूक निर्णय अधिकारी माणिक आहेर यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि. ९) झाली. या बैठकीत डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची सूचना सुनील तांबे यांनी मांडली. त्यास अशोक घोलप यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्षपदासाठी शिरसाठ यांच्या नावाची सूचना किरण दिघे यांनी मांडली. त्यास अनिल भोसले यांनी अनुमोदन दिले.
Oplus_131072
जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दोघांच्या नावाची घोषणा करून नवीन संचालक मंडळाला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, की मागील कार्यकाळात अनेक चढउतार आले. मात्र सर्वांनी एकत्र काम करून मार्ग काढला. आव्हानात्मक परीस्थितीत सभासदांना चांगला भाव कारखान्याने दिला. पद्मश्री डॉ. विखे पाटील आणि आणि दिवंगत खासदार विखे पाटील यांच्या विचारांनी आणि सहकार चळवळ सक्षम करण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जनसेवा मंडळाच्या ज्येष्ठ नेत्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांनी आभार मानले. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांचेही भाषण झाले.
Oplus_131072
उच्चांकी गाळप करून चांगला भाव देऊन
डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानून, कठीण काळात चांगले काम करून उच्चांकी गाळप आणि सभासदांना चांगला भाव देण्याची ग्वाही दिली.