प्रत्येक सैनिकाचे स्वप्न असते की नौकरीच्या काळामध्ये एकदा तरी पाकड्यांशी लढावे : राजेंद्र दरेकर

 

 

आश्वी । झुंजार न्यूज 

 

 

प्रत्येक सैनिकाचे स्वप्न असते की आपल्या १५ ते २० वर्षाच्या नौकरीच्या काळामध्ये एकदा तरी पाकड्याशी समोरा समोर युध्दात सहभागी व्हावे.माझे नशीब आहे की माझी ड्युटी ही श्रीनगर परिसरामध्ये असुन मला लढाण्याची संधी आली असल्याचे आश्वी खुर्द येथील भारतीय सैन्यदलात असलेले राजेंद्र दरेकर यांनी काढले.
   

 

 

 

Oplus_131072

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.सैन्य दलात कामवर असलेल्या तसेच सुट्टी साठी गेलेल्या सर्व सैनिकाच्या सुट्ट्या रद्द झाल्यामुळे तसेच भारत पाकिस्तान युद्ध जन्य परिस्थिती मुळे सुट्टीवर आलेले आश्वी खुर्द (ता.संगमनेर) येथील जवान राजेंद्र दरेकर हे आपल्या पोस्टींग वर हजर होण्यासाठी निघाले असता ग्रास्थानी तसेच त्यांच्या परीवारने त्यांना हसत निरोप दिला.यावेळी माजी सरपंच म्हाळु गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, माजी उपसरपंच संजय गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष कैलास गायकवाड, भारतीय लहुजी सेनेचे राज्य सचिव संतोष भडकवाड, बाबासाहेब भोसले, नाथभक्त विठ्ठल मोरे, मनोज कहार, सुरेश गायकवाड, किरण बिडवे, तलाठी शिवाजी दरेकर, आण्णा शेंडकर, कादर सय्यद, शरद भडकवाड, सचिन बोरुडे पत्रकार वैभव ताजणे आदि उपस्थित होते
 

 

 

Oplus_131072

 

जवान राजेंद्र बाळासाहेब दरेकर हे सन २०११ साली इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिस फोर्स मध्ये भरती झाले असुन त्यांनी पंजाब, लेह, लद्दाख, आसाम, तामिळनाडु आदि ठिकाणी देशसेवा केली आहे व गेल्या तिन वर्षापासुन जम्मु काश्मीर च्या श्रीनगर येथे कॉन्सटेबल जीडी या पदावर कार्यरत आहे. आठ दिवसापूर्वी ते एक महिन्याच्या सुट्टीवर गावी आले होते मात्र पहलगाम येथील २८ पर्यटकांवर दहशतवादयांनी हाल्ला करत ठार केल्यानंतर भारतांने कठोर भुमिका घेत चोख प्रत्युत्तर दिले आहे. गेली तिन दिवसांत परिस्थिती गंभीर होत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून सुट्टीवर असलेल्या सर्व सैनिंकाच्या सुट्टया रद्द करण्यात आल्यानंतर राजेंद्र दरेकर ही दिल्लीला रवाना झाले
 

 

 

Oplus_131072

 

ऑपरेशन सिंदूर चा भाग होण्यासाठी माझे पती कॉन्सटेबल जीडी राजेंद्र बाळासाहेब दरेकर यांना संधी मिळाती याबद्दल आनंद आहे. पाकिस्तानी अतिरेक्यांनी जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्या मध्ये अनेक निषपाप भारतीयाना मारले त्यांचा बद्दला भारतीय सैनिक घेत आहे. सर्व सैनिकांना माझ्याकडुन विजयासाठी शुभेच्छा.

 

कल्याणी राजेंद्र दरेकर,आश्वी खुर्द  
 

 

 

आपल्या देशावर जे मोठे संकट उभे राहिले असुन त्यासाठी सर् भारतीयान एकजुट होत त्याविरोधात मुकाबला करणे आवश्यक आहे. माझे विद्यार्थी राजेंद्र दरेकर हा शालेय जिवणापसुन अतिक्षय शिस्त प्रिय होता. नाथ परीवाराचा तो एक सदस्य असुन माझ्या परीवाराकडून तसेच समस्त नाथ भक्ताकडुन त्यांस पुढील कार्य़ास शुभेच्छा

 

 विठ्ठल मोरे, ओम चैतन्य कानिफनाथ दरबारचे प्रमुख 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed