साकूर । झुंजार न्यूज

 

 

शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी रूग्णालय उभे करून कोट्यावधी रूपयांचा खर्च करत आहे. तसेच ग्रामीण, प्राथमिक रूग्णालयाच्या सुसज्ज इमारती उभ्या करून सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहे. मात्र काही ठिकाणी इमारतीच अक्षरशः निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कारण संगमनेर तालुक्यातील साकूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. गेल्या अनेक वर्षांपासून चक्क ग्रामीण रुग्णालयाच्या मुख्य इमारतीलाच गळती लागल्याच खळबळजनक वास्तव समोर आलय.

 

 

 

Oplus_131072

 

साकूर येथील ग्रामीण रुग्णालयात दररोज शेकडो रुग्णांवर उपचार केले जातात. ते बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभागात उपचार घेत असतात. त्यासाठी रुग्णालयाची सुसज्ज अशी मुख्य इमारत उभी आहे. मात्र इमारतीची डागडुजी नियमित करणे आवश्यक आहे. परंतु या, डागडुजीकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले आहे. विशेषतः इमारतीचे निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने पावसाळ्यात छतामध्ये पाणी झिरपत असल्याने इमारतीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तसेच काही कक्षांमधील छताला भेगा पडल्या आहेत. त्यामुळे छताला गळती लागली आहे. छतगळतीमुळे ठिकठिकाणी रूममध्ये अक्षरशः बुरशी लागलीय. तसेच काही ठिकाणी छताचे पापुडे देखील खाली कोसळले आहे. त्यामुळे आंतररूग्णांच्या जीवीतास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या धक्कादायक प्रकारामुळे अक्षरशः रुग्णांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

 

 

Oplus_131072

 

विशेष म्हणजे शस्त्रक्रिया गृहच्या बाहेरील पॅसेजमधील गळतीमुळे काही महिने अक्षरशः शस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही ठिकाणी भिंतीच्या स्टाईल पडल्याने रूग्णालयाची अक्षरशः दुरवस्था झाली आहे. त्याचबरोबर छतावरील अग्नीशमनची ५ हजार लिटरच्या पाण्याची टाकी फुटलेली आहे. स्लॅबवरील ड्रेनेजचे पाईप देखील खराब झाले आहे. एवढा गांभिर्यपुर्वक प्रकार असल्याने इमारतीच्या दूरूस्तीबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला. मात्र बांधकाम विभागाने याकडे तर अक्षरशः साधं डुंकुनही बघितले नाही. उलट पत्रालाच केराची टोपली दाखवली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारामुळे रूग्णालयाच्या इमारतीलाच धोका निर्माण झालाय. बांधकाम विभाग आता छत कोसळल्यावरच लक्ष देणार का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. त्यामुळे या विषयाकडे आता लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed