अहिल्यानगर । झुंजार न्यूज

 

 

अहिल्यानगर येथील जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची अमरावतीचे जिल्हाधिकारी पदावर बदली झाली आहे. त्यांच्या बदलीचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने आज, बुधवार ( २१ मे ) रोजी काढले आहेत. त्यांच्या जागी पुणे येथील अतिरिक्त भू-संपादन आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमापन नोंदी आनंद भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

 

आनंद भंडारी यांनी आपल्या शासकीय सेवेला २००१ मध्ये नायब तहसिलदार सातारा येथून सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन ते महाराष्ट्र विकास सेवेतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी वर्ग १ च्या पदासाठी निवडले गेले.

 

 

Oplus_131072

 

त्यानंतर आनंद भंडारे यांनी २००२ ते २००३ – परिविक्षाधीन गट विकास अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, २००३ ते २००७ – गट विकास अधिकारी, पंचायत समिती खेड, पुणे जिल्हा, २००७ ते २०११ – गट विकास अधिकारी, पंचायत समिती जुन्नर, २०११ ते २०१४ – उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पुणे, २०१४ ते २०१८ – उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, सातारा, २०१८ ते २०१९ – प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, अमरावती, २०१९ ते २०२१ – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड, २०२१ ते २०२२ पर्यत सेवा केली. सध्या ते पुणे येथे अतिरिक्त भू-संपादन आयुक्त तथा अतिरिक्त संचालक भूमापन नोंदी म्हणून कार्यरत आहेत

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *