अंभोरे गणातून खेमनर विरुध्द घुगे असा सामना होवू शकतो ?
आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर शहर नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्याची सफेद पेहरावामधून भावगर्दी दिसून येत आहे. ग्रामीण भागातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समितीची चाचपणी सुरू झाल्याने आरक्षण कुठलेही निघू, मात्र, आपण प्रवाहात असल्याचे जाणीव करून देण्याची कार्यकर्ते धडपड करताना दिसून येत आहे.

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदारसंघातील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला असणारा जोर्वे जिल्हा परिषद गटात आरक्षणाचा विचार न करता काँग्रेस व भाजपसह विविध इच्छुकांची चाचपणी सुरू असून हा गट म्हणजे मंत्री थोरातांचे ‘माहेर’ घर, तर विखे पाटील यांचा ‘विधानसभा मतदारसंघ’ असल्याने विखे थोरात कार्यकर्त्यांची सरळसरळ लढत असून दोन्हीकडूनही विविध नावांची जोरदार चर्चा होताना दिसत असली तरी थोरात – विखेच्या भुमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष्य लागल्याचे दिसत आहे.

जोर्वे जिल्हा परिषद गट म्हणजे संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील महत्त्वाचा जि. प. गट असून या गटात येणारी निम्मी गावे हे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघातील, तर निम्मी गावे हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मतदारसंघातील आहेत. विखे – थोरात या दोन्ही नेत्यांचा मोठा प्रभाव या गटावर आहे. या भागात बहुतांश वर्षांपासून विखे आणि परिवाराशी येथील लोकांची नाळ जुळलेली असल्याने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांचे कार्यकर्ते संच मोठा प्रमाणात आहे, तर स्वतः चे गाव, विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून व जुन्या ऋणानुबंधाने राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा परिसरावर प्रभाव आहे. थोरात विखे एकत्र असो अथवा नसो २०१९ पर्यंत सोयीचे निवडणुकीचे राजकारण दिसले. मात्र, मागील झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत विखे थोरात काँग्रेस पक्षात असताना सुद्धा विखेंनी जोर्वे गटात, तर थोरातांनी आश्वी गटात अपक्ष उमेदवार देवून कार्यकर्त्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती.दोन्ही ठिकाणी अपक्षाची दाळ शिजली नाही. मात्र, विरोधाची मात्र ठिणगी पडली. कुठलाही कार्यक्रम असो एकमेकांवर टीका-टिपणी दिसून आली असून आता तर दोन्ही नेत्यांची भूमिका वेगळी, पक्ष वेगळा होवून लोकसभा , विधानसभेत संघर्ष दिसला लोकसभा निवडणुकीत दक्षिणेतून डॉ सुजय विखे पाटील यांना पाडण्यात महत्वाची भूमिका थोराताची होती असे बोलले जावून मनाशी खूण गाठ ठेवून डॉ विखे यांनी विधानसभेत थोरातांना पाडण्याची चाणक्यनिती भूमिका बजावल्याने संगमनेर अमोल खताळ आमदार झाले असल्याने मिनी मंत्रालयात सत्ता मिळविण्यासाठी जोरदार फिल्डींग लागणार हे मात्र निश्चितचं !

नुकत्याचं झालेल्या सहकारी तत्वावरील विखे – थोरात दोन्ही साखर कारखाना निवडणुका बिनविरोध झाल्या मात्र हा सहकारी तत्वावरील समझोता समजला गेला मात्र राजकारण म्हणून दोन्ही नेत्याची भूमिका ही मात्र पक्षाबरोबरचं असल्याने महाविकास आघाडी विरोधात महायुती असाचं सामना जि प प स निवडणुकीच्या माध्यमातून बालेकिल्ल्यापासून संपूर्ण जिल्हयात जोरदार प्रयत्न होणार यात तीळमात्र शंका नाही. जोर्वे जिल्हा परिषद गट हा पाहिजे तसा सोयीस्कर नसून विविध जाती-धर्माचे, सुशिक्षित व सधन लोक असून राजकारणाविषयी जाणकार असून हा बागयत भाग असताना सुद्धा विखे – थोरातांच्या भोवती वलय दिसत आहे. सहकाराच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांनी आपले वर्चस्व निर्माण करून कार्यकर्तेचे जाळे निर्माण केले आहे.

दोन्ही विधानसभेच्या सीमेवरील ही गावे आहेत. विकासात्मक कामे चढाओढीने होताना दिसत आहे. दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत अनेकांची इच्छा दिसून येत आहे. मात्र, वरिष्ठांचा कोणावर आशीर्वाद पडेल सांगता येत नाही. या गटात संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांचा मोठा प्रभाव असला तरी संध्यातरी ते निवडणुकीकरिता इच्छुक दिसत नसले तरी शेवटच्या क्षणी काही होवू शकते मात्र डॉ जयश्रीताई थोरात यांनी संपूर्ण जोर्वे गट पिंजून काढल्याने थोरात गटाकडून त्यांचे नाव आघाडीवर दिसत आहे तर विखे गटाकडून जोर्वे विद्यमान संरपच पिंती गोकूळ दिघे अथवा गोकूळ दिघे यांची नावे चर्चेत दिसत आहे .मात्र परिसरात लोकांच्या होणाऱ्या चर्चेतून थोरात व विखे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
अंभोरे गणाकडे सर्वांचे लक्ष , दोन माजी संरपचामध्ये झुंज !
जिल्हा परिषद जोर्वे गटातील अंभोरे गण हा ओपन अथवा प्रवर्ग पुरुष निघाल्यास थोरात गटाकडून अंभोरेचे माजी संरपच भास्कर खेमनर तर विखे गटाकडून मालुंजेचे माजी संरपच संदिप घुगे या दोन आक्रमक माजी संरपंचामध्ये ही लढत आजच्या राजकिय वातावरणामधून निश्चित होवू शकते अशी परिसरात जोरदार चर्चा होताना दिसत आहे. तर थोरात गटाकडून राहुल खेमनर हे तरुण कार्यकर्ते सुध्दा इच्छुक आहे .
महायुतीचा घटक पक्ष म्हणून लोकसभा , विधानसभा निवडणुकीत रिपाई ( आठवले ) कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केल्याने त्यांचे बक्षिस म्हणून जोर्वे व आश्वी गट रिपाईला मिळण्याची शक्यता त्याचं अनुषगाने लवकर रिपाई भव्य मेळावा आश्वी होणार असल्याचे रिपाई तालुकाध्यक्ष आशिष शेळके यांनी सांगितले .


