शिबलापूर | झुंजार न्यूज

 

सहकारात राजकारण आल्यास शेतकरी संपेल हे स्वर्गीय खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी देवून गेलेल्या संदेशाचे थोरात – विखे यांनी पालन करत सहकारात राजकारण नको म्हणून दोन्ही कारखान्याच्या निवडणुका ह्या बिनविरोध करुन घेतल्या त्या केवळ शेतकऱ्यांच्या हिताकरिता राजकारण द्वेषाचे नव्हे तर विकास व लोककल्याणाकरिता करण्याचे हे विखेचे धोरण असल्याचे मत पदमश्री डॉ विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले .

संगमनेर तालुक्यातील शिबलापुर येथील निळवंडयातून आलेल्या गावतळ्यातील पाणी पूजन व वीज वितरण कंपनीचे सबस्टेशनच्या भूमिपूजन प्रसंगी डॉ सुजय विखे बोलत होते कार्यक्रमांचे अध्यक्षस्थानी पचायत समिती माजी सदस्य तबाजी मुन्तोंडे होते तर विखे कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास तांबे , भगवानराव इलग , गुलाबराव सांगळे रिपाई तालुका उपाध्यक्ष नानासाहेब कदम , पोपटराव वाणी , जेहूरभाई शेख , गोकूळ दिघे , सरूनाथ उंबरकर , भारतराव गीते , रावसाहेब घुगे , नानासाहेब शिदे , अशोक तळेकर , ॲड अनिल भोसले , विजय म्हसे , अशोक जऱ्हाड , मोहीत गायकवाड , दिपक रक्टे , संरपच सुनिल मुन्तोंडे , सतिष जोशी , राजू नागरे , संभाजी मांढरे , प्रकाश शिदे , बांधकाम अभियंता काशिनाथ गुंजाळ , वीज अभियंता प्रदिप वाट्टमवार , प्रेमराज पाटील आदीसह शासकिय कर्मचारी व परिसरातील कार्यकर्ते पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते .
Oplus_131072
डॉ सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की , विधानसभा निवडणुकीत विखेंना मताधिक्य मिळते मात्र ग्रापचायतीत आपली सत्ता का ? येत नाही हे कोडे काय लक्ष्यात येत नाही सत्ता नसेल तर विकासात्मक कामाला मर्यादा येते . तेव्हा भविष्यात यात सुधारणा होणे महत्त्वाचे आहे . तर निळवंडेवर ४० वर्ष राजकारण झाले . आरोप – प्रत्यारोप झाले एकाचं मुख्यमंत्र्यांनी तीनवेळा भूमीपूजन केले . मात्र सर्व काही झाले मात्र निळवंडयातून कालव्याद्रारे पाणी सोडण्याचे पुण्य हे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाचं लाभले .
आता निळवंडे कालव्याच्या प्रत्येक लाभार्थीयापर्यंत पाणी पोहचू लागले येत्या दोन वर्षात कुठलाचं भाग जिरायत राहणार नाही अशी ग्वाही डॉ सुजय विखे पाटील यांनी शेवटी दिली .
Oplus_131072
यावेळी डॉ सुजय विखे पाटील यांची गावापासून ते पाणी पूजन स्थळी वाजत गाजत मिरवणुक काढली भगवान बाबाच्या मंदिरात जावून त्यांचे दर्शन घेवून डॉ सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्तेसमवेत पाणी पूजन केले .
आपण द्वेषाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करतो , काम करणाऱ्यांना काम करुन दया . मी खासदार असताना एवढा प्रसिध्द नव्हतो मात्र माजी खासदार म्हणून राज्यात गाजलो . गणेश , लोकसभा नंतर विधानसभेत सुध्दा सुध्दा विखेंना झटका बसणार मात्र लोक हितकार विकास केल्याने त्याची पुण्याई मिळाली . आणि परिस्थिती बदलली .
Oplus_131072
सहकारात राजकारण नको म्हणून आम्ही दोघांनी ही भूमिकेत बदल करत साखर कारखाने निवडणुका बिनविरोध केल्या अन् दोन्ही माजी प्रतिनिधी हे कारखान्याचे चेअरमन झाले .
डॉ सुजय विखे पाटील
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *