संगमनेर l झुंजार न्यूज

 

 

 

 

दुग्धप्राशन हे सर्वाधिक प्रमाणात भारतातच केले जाते किंबहुना दुग्धप्राशनाशी प्राचीन परंपरा केवळ भारतातच आहे असेही म्हणता येईल. मागणी अधिक असेल तर पुरवठाही तेवढा व्हायला हवा हे आर्थिक बाजारपेठेचे मूलभूत सूत्र आहे. महाराष्ट्रात आज दुधाचे उत्पन्न भरपूर असून या क्षेत्रापुरता महाराष्ट्र आत्मनिर्भर आहे, म्हणूनच महाराष्ट्राला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरण्याची नामी संधी आहे.

 

ही बाब लक्षात घेऊनच राजहंस अर्थात संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाने महाराष्ट्राला दूध उत्पादनात अग्रेसर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे हे पाऊल म्हणजे मिशन ५० लिटर ही योजना राजहंस ने २०२३ मध्ये सुरू केली. पुढील पाच वर्षात या योजनेतून महाराष्ट्रातील दूध उत्पादन क्षेत्रात कायापालट सुरू करावा हे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवूनच हा उपक्रम कालबद्धरित्या राबविण्यास राजहंसने सुरुवात केली आहे.

 

 

पंजाबमध्ये दिवसाला ५० लिटर्सपर्यंत दूध देणार्‍या गायी आहे,त अशा गायी पंजाबमधून आणल्या तर येथील प्रतिकूल हवामानाला त्या तग धरत नाहीत. काही महिन्यांनी त्या दगावतात. पिढी-दर-पिढी गणिक अधिक दूध देणार्‍या गायींची पैदास करण्यासाठी सशक्त कालवडींची निवड करून त्यांच्यात उत्तम प्रतिच्या सशक्त वळुचे कृत्रिम रेतन करून प्रतिदिन ५० लिटर दूध देणार्‍या गायींची प्रजाती, नवी पिढी घडविणे हे ‘मिशन ५० ली’चे उद्दिष्ट आहे.

 

 

 

या मिशन अंतर्गत २५० शेतकर्‍यांची निवड करण्यात आली आहे. या शेतकर्‍यांकडे प्रत्येकी किमान पाच सशक्त गायी आहेत. या सर्व गायींची विशेष देखभाल करण्यासाठी एका पशुवैदयक तज्ञांच्या नेतृत्वाखाली २५ प्रशिक्षित डॉक्टर्सची नेमणुक करण्यात आली आहे. प्रत्येक गायीची नियमित तपासणी केली जात आहे. तिला ठराविक आहार दिला जातआहे. निवड केलेल्या गायींसाठी सिध्द वळूंच्या सिमेन्सचा वापर करून उच्च प्रतीच्या कालवडी दूध उत्पादकांच्या गोठयात तयार होणार आहेत. त्या कालवडींची विशेष देखभाल करून त्यांना मिल्क रिप्लेसर व इतर आवश्यक खादय दिले जाईल व वेळेवर जंतनिर्मूलन केले जाईल. अशा प्रकारे कालवडीचे संगोपन केल्यानंतर दोन वर्षानंतर एक नवी पिढी तयार होईल. प्रत्येक पिढीत दूध क्षमता वाढत जाईल. पाच वर्षांनतर या योजनेतील पिढी दिवसात ५० लिटर दूध देईल. हा उपकम पुढेही सुरू राहील.

 

 

 

राजहंस दूध संघाची सूत्रे २०१५ साली माझ्या हाती आली. मूरघास, मुक्तगोठा आणि आधुनिक मुक्तगोठा महत्वाकांक्षी उपकम मी टप्याटप्याने यशस्वीरित्या कार्यान्वित केले आहेत. या योजनांमुळे राजहंससच्या दुधाचे संकल वाढले.

 

 

 

 

कोरोनाच्या काळात आम्ही दूधभुकटी प्लांट सुरू केला. माझ्या कारकिर्दीत राजहंस उत्पादने बाजारात अधिकाधिक पोहोचावित म्हणून विशेष पणन उपक्रम राबविले. मिशन ५० लिटर योजनेद्वारे एका नव्या धवलकांतीकडे महाराष्ट्र वाटचाल करत आहे. –

 

मा. रणजीतसिंह देशमुख

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed