आश्वी । झुंजार न्यूज
संगमनेर तालुक्यातील पूर्व भागातील एक लढवय्ये व्यक्तिमत्व व कायमस्वरूपी दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या गेली कित्येक वर्ष विकासापासून वंचित राहिलेल्या पिंप्री लौकी अजमपुर गावाच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार राजकीय सामाजिक शैक्षणिक व आरोग्य सेवेत उत्तुंग काम करणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसाला आपलेसे वाटणारं वकृत्व कर्तृत्व व सर्वसामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे स्वर्गीय पद्मभूषण खासदार बाळासाहेब विखे पाटलांच्या व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या विचाराचा प्रभाव असणारे राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे विश्वसुशिलेदार सन्माननीय भारतराव पाटील गीते हे खऱ्या अर्थाने जनसामान्यांचा आधारस्तंभ आहे .

आज ते वयाच्या यशस्वी 58 वर्षात पदार्पण करत असताना त्यांनी समाज हितासाठी अनेक काम केलेली आहे एक संघर्षमय कार्यकर्ता जनतेच्या कामासाठी रस्त्यावर उतरणारा नेता अशी त्यांची सर्वसामान्य माणसांमध्ये ओळख आहे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजकारणामध्ये त्याची मोठे काम आहे राष्ट्रसंत भगवान बाबा ही त्यांचे आराध्य दैवत आहे समाजाचे नेतृत्व करत असताना जनतेला काय मिळेल यासाठी ते अहोरात्र काम करतात त्यांच्या कामाचा वक्तृत्वाचा तालुक्या जिल्ह्यात अनुभव आहे .

एक लढवय्या नेता म्हणून आज ती गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे नेते म्हणून आश्वी संगमनेर ता परिसरात सुपरिचित आहे . आपण समाजाचे देणे लागतो या भावनेने त्यांनी पिंप्री गावामध्ये गेले दहा वर्षांमध्ये महिलांचा पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न राज्याचे जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गाला लावला आज कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त गावाला घरोघरी नळाद्वारे महिलांना पाणी मिळते ही मोठ पुण्याचं काम त्यांनी केलं आजही पिंपरी गावामध्ये अंगणवाडीचे हायस्कूल पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळते गावाला जोडणारे रस्ते गावअंतर्गत रस्ते गावातील मूलभूत सुविधा डिजिटल शाळा अशी विकासाचे अनेक कामे मार्गाला लावून गेले अनेक वर्ष आरोग्याच्या समस्येने त्रस्त असलेले आहे नागरिकांना नामदार विखे पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अद्यावत रुग्णालय सुरू करून आरोग्याचाही प्रश्न सुटल्यामुळे गावामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे खऱ्या अर्थाने आपण समाजाची देणे लागतो या उदात्त हेतूने काम करणारे भारतराव पाटील गीते हेजनहिताचे कैवारी आहेत असे म्हटले तर वावघे ठरणार नाही .

त्यांनी केलेले आश्वी जिल्हा परिषद गटात काम आजही सर्वांच्या नजरेत आहे निळवंडे चा प्रश्न आश्वी गटातील रस्त्यांचा प्रश्न असे अनेक प्रश्न नामदार विखे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली मार्गाला लावण्यासाठी सातत्याने धडपड करणारे एक आगळे वेगळे व्यक्तिमत्वभारतराव गीते यांना वाढदिवसाच्या आश्वी प्रेस क्लब व संगमनेर तालुका पत्रकार संघ व मित्र मंडळाच्या वतीने मनापासून शुभेच्छा

त्यांच्या राजकीय जीवनात अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो तसेच परमेश्वर यांना उदंड आयुष्य आरोग्य संपदा ऐश्वर्य भरभराटी लाभो अशी तमाम जनतेच्या वतीने प्रार्थना
श्री राजेश गायकवाड ( पत्रकार दैनिक पुढारी )
