संगमनेर | झुंजार न्यूज

संगमनेर तालुक्यातील कोठे मलकापूर येथील सुनील पांडुरंग भूतांबरे व किरण पाराजी गावडे यांचे अपघातात दुःखद निधन झाले. ही माहिती मिळताच लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन कार्यालयाच्या वतीने मयतांच्या कुटुंबीयांना किराणा किटचे वाटप करून मदतीचा हात देण्यात आला आहे.

भूतांबरे व गावडे कुटुंबांना किराणा किट देण्यात आली यावेळी आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, सरपंच राहुल गंभीरे माजी सरपंच लक्ष्मण गीते, नामदेव भूतांबरे, अर्जुन गावडे, गंगुबाई भूतांबरे , गीताबाई भूतांबरे ,नवनाथ गंभीरे, रोहिदास नागरे, सोनाली भुतांबरे ,पाराजी गावडे ,अक्काबाई गावडे, मीराबाई गावडे, उपसरपंच पोपट पचपिंड, संदीप पचपिंड, भाऊसाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी तालुका हा कुटुंबाप्रमाणे मानला असून त्यांनी सातत्याने गोरगरीब व सर्वसामान्य लोकांना नेहमी मदत केली आहे. याचबरोबर तालुक्यातील  गाव आणि वाडी वस्तीवर विकासाच्या योजना राबवल्या आहेत. थोरात साहेब यांच्या सूचनेनुसार यशोधन कार्यालयाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन भांड, कार्यालयीन अधीक्षक रामदास तांबडे यांनी भूतांबरे व गावडे कुटुंबांना किराणा किटचे वाटप केले आहे.
या अपघाताच्या दुःखद घटनेची माहिती मिळताच थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांनीही या दोन्ही कुटुंबाची काल सांत्वन्पर भेट घेतली होती. यावेळी त्यांच्यासमवेत शंकर पा. खेमनर ,संचालक विलास शिंदे, उपसरपंच राहुल गंभीरे, लक्ष्मण गीते, उपसरपंच पोपट पचपिंड, संदीप पंचपिंड यांसह कार्यकर्ते उपस्थित होते
राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *