संगमनेर | झुंजार न्यूज

 

 

 

राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोर्वे गावात अनेक विकास कामाची घोडदौड सुरू असल्याने अनेकांच्या पोटे दुःखू लागल्याने या ना त्या कारणाने ग्रामपचायतीला बदनाम करण्याचे विरोधकांचे षडयंत्र सर्व सामान्य लोकांनी व महिलांनी मोर्चाला झालेल्या गर्दीतून दाखवून दिल्याचे प्रतिक्रिया जोर्वेचे संरपच प्रितीताई गोकूळ दिघे यांनी व्यक्त केली .

 

 

 

संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील ग्रामपचायत निवडणुकीत जनसेवा विकास मंडळाच्या माध्यमातून एकमेव महिला पिंती दिघे या लोकनियुक्त संरपच म्हणून निवडून आल्याने विरोधी गटानी त्यांना राजकिय द्वेषातून कात्रीत पकडण्याचे धोरण आखल्यानेचं ग्रामपचायतीच्या विविध कार्यक्रमातून बिनबुडाचे आरोप केले जात असल्याने त्यांच्या विरोधात जोर्वे ग्रामस्थांनी पचायत समिती येथे मोर्चा नेवून आरोप करणाऱ्यावर कारवाईची निवेंदनाद्रारे गटविकास अधिकारी ठाकूर यांच्याकडे मागणी केली .

 

 

या निवेदनात म्हटले की , जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील पिंतीताई दिघे या संरपच झाल्यानंतर त्यांनी ग्रामपचायतीच्या कारभार चालविताना निपक्ष व कणखरपणे चालविण्याचे धोरण घेतले त्यामुळे विकासाची गंगोत्री वाहू लागली ग्रामपचायत कार्यालय , ट्रक्टर , ट्रॉली ‘ टेंकर , ब्लोर , ॲम्ब्युलन्स , हॉस्पीटल , अमररथ , रस्ते , स्टेट लाईट , सोलर लॅम्प , नविन ट्रान्सफार्मर , पाणी पुरवठा योजना , वैयक्तिक लाभाच्या योजना , आदीसह  एक ना अनेक विकासाच्या योजना गावात येवू लागल्याने लोकांची लोकप्रियत्ता वाढू लागली . विरोधाकांकडे अनेक वर्ष हातात सत्ता असताना ही विकास कामांना प्राधान्य दिली गेली नसल्याने चित्र दिसले . 

 

 

जोर्वे हे गांव शिर्डी विधानसभा मतदारसंघात असल्याने ना. राधाकृष्ण विखे पाटील हे प्रतिनिधीत्व करत असल्याने ते स्वतः जिल्हयाचे पालकमंत्री असून . मतदारसंघातील प्रत्येक गांव हे विकासात्मक व्हावे हे त्यांचे धोरण असल्यानेचं मोठ्या प्रमाणात विकास कामे होवू लागली आहे . तसेचं जोर्वे गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा काम सुरू होत आहे त्यात आता जिल्हा परिषद व पचायत समितीच्या निवडणुकीची चाहुल लागू लागल्याने विरोधकांकडे मुद्दाच नसल्याने विनाकारण कोणच्या तरी माध्यमातून बिनबुडाचे आरोप करुन वातावरण दोषीत करण्याचे धोरण होत असल्याने अशा आरोप करणाऱ्यांवर त्वरीत कारवाई व्हावी याकरिता संरपच पिंतीताई गोकूळ दिघे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर येथील पचायत समिती वर महिलासह ग्रामस्थांचा मोर्चा काढण्यात आला होता .

 

 

विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जोर्वे गावांत विकासात्मक कामे होवू लागल्याने विनाकारण सोशल मिडीयामधून भष्ट्चाराचे झाल्याचे मेसेज पाठवून लोकांची दिशाभूल केली जात असून ” ये पब्लिक है , सब जाणती है। म्हणीनुसार लोकांना माहिती आहे की भष्ट्राचार कोणी केला खोटे नाटे आरोप सहन केले जाणार नाही . हा फक्त राजकिय स्टंट निर्माण करण्याचे धोरण आहे .

 

पिंतीताई गोकूळ दिघे ( लोकनियुक्त संरपच , जोर्वे )

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *