पिंप्री लौकी अजमपूर । झुंजार न्यूज 

 

 

संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपूर व पानोडीच्या शिवावरील बोंद्रे वस्तीवर गिणी गवतात एक बिबट्याचं पिल्लू आढळल्याने या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

पानोडी – पिंप्री लौकी अजमपूर या मधल्या रस्त्यावरील असणाऱ्या शिवाजी मारुती बोंद्रे यांच्या वस्तीच्या शेजारी व ओढयाच्या बाजूला अशोक बोंद्रे यांच्या असणाऱ्या गिनी गवतात १४ वर्षिय कु. साई , व २० वर्षिय कु निलेश . हे गिनी गवत कापण्यासाठी गेले असता त्यांच्या पायाशी बिबट्याचं पिल्लू आढळले . ते पिल्लू माजरीचे असेल असे समजवून बऱ्याचं वेळ त्यांनी या पिल्लाचे निरिक्षण केल्यानंतर ते बिबट्याचं पिल्लू असल्याचे समजताचं त्यांनी भीती पोटी तेथून पळ काढला. कु. साई व कु. निलेश यांचे नशिब बिबट्या मादी तेथे नसल्याने मोठा अनर्थ टळला .

Oplus_131072

यानंतर शिवाजी बोंद्रे यांनी पत्रकार राजेश गायकवाड मार्फत वनाधिकारी राम मंडपे यांना याची माहिती दिल्याने घटनास्थळी वनखात्याचे देवीदास चौधरी , सुखदेव सुळ , संजय गागरे या सर्वांनी भेट दिल्यानंतर त्यांना ही एक बिबट्याचं पिल्लू आढळून आले . त्यांनी त्या पिल्लांला त्यांच्या घरट्या पासून दूर अशा सुरक्षित जागे ठेवले . मात्र रात्री पुन्हा बिबट्या मादी तेथे आल्याने त्या पिल्लाला पुन्हा तेथेचं आणले व आरडा ओरडा करु लागले या गोष्टीवर लक्ष्य ठेवून असलेले बोंद्रे यांनी पुन्हा वनाधिकाऱ्यांना या गोष्टी कल्पना दिल्याने वन साहाय्यक मंडपे हे वन कर्मचाऱ्यासह तातडीने घटनास्थळी पोचले त्यांनी तेथील असणारे वातावरण शांत असल्याचे बघून काही प्रमाणात गिनी गवत कापले . बिबट्याचं पिल्लू हे एक ते दीड महिन्याचे असून बोंद्रे यांना एकचं पिल्लू आढळले मात्र तेथे दोन पिल्लं व मादी असण्याची शक्यता वनाधिकाऱ्यांनी सांगितले आहे .

Oplus_131072

 

गिनी गवत डोक्यापेक्षा मोठे असल्याने बिबट्या मादीचा अंदाज न आल्याने आजू- बाजूच्या शेतकऱ्यांनी , मुलांनी ८ ते १० दिवस काळजी घ्यावी . पिल्लू चालू लागल्यास पिल्लांसह बिबट्या मादी आपल्या हालचाली नुसार जागा बदलू शकते .जर जागा बदलली नाही तर पिंजरा लावण्यात येईल .

 

राम मंडपे ( वनरक्षक , संगमनेर )

Oplus_131072

 

 

पानोडी , पिंप्री लौकी अजमपूर परिसरात बिबट्यांचं मोठे दहशत निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे . थोरात विदयालयाच्या प्रांगणात , शिबलापूर – पानोडी रस्त्यावर अनेकांना दर्शन दिल्याची चर्चा आहे .

Oplus_131072

 

जागेत बदल झाल्यामुळे बिबट्या मादी चौताळलेली असणार आहे तेव्हा लवकरात लवकर पिंजरा लावावा अशी मागणी शिवाजी बोंद्रे यांनी केली आहे .

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *