शिर्डी : झुंजार न्यूज

श्री साईबाबांच्या जीवनकार्यासह श्रीसाईबाबा संस्थानमार्फत सुरू असलेल्या विविध सेवाकार्यांचा प्रचार- प्रसार डिजिटल माध्यमांतून अधिक प्रभावी व्हावा, या हेतूने लवकरच सोशल मिडिया इन्फ्लुएंसर व यूट्यूबर संमेलन श्रीसाईबाबा संस्थानच्यावतीने व शिर्डी ग्रामस्थांच्या सहकार्यातून आयोजित करण्यात येणार आहग. यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत, अशी माहिती श्रीसाईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.

 

 

श्री. गाडिलकर म्हणाले की, अलिकडील काळात सोशल मिडिया हे प्रभावी संवादासह प्रसाराचे महत्त्वाचे माध्यम ठरले आहे. शिर्डी संस्थानच्या सेवा कार्याचा व्यापक प्रचार व्हावा, या दृष्टिकोनातून शिर्डी ग्रामस्थांनी विशेष डिजिटल संमेलन आयोजित करण्याची मागणी केली होती.

Oplus_131072

 

या प्रस्तावाला तदर्थ समितीची मान्यता मिळाली. त्यानुसार संमेलन लवकरच पार पडणार आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ८ ऑगस्ट २०२५ पर्यंत अर्ज सादर करावा. अर्ज संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sai.org.in तसेच जनसंपर्क विभागामध्ये उपलब्ध आहे.

Oplus_131072

पात्रतेच्या अटी !

 

अर्जदार सोशल मीडियावर सक्रिय असावा किमान ५० हजार फॉलोअर्स / सबस्क्राइबर्स असणे आवश्यक आहे. अध्यात्मिक, समाजोपयोगी व प्रेरणादायी आशयावर आधारित व्हिडिओ तयार करण्याचा अनुभव असावा. यापूर्वी कोणतीही वादग्रस्त पोस्ट केलेली नसावी. संमेलनासाठी पात्र अर्जाची तपासणी करून, निवडलेल्या

 

Oplus_131072

इन्फ्लुएंसर्सना संमेलनाचे ठिकाण, तारीख व वेळ संस्थानमार्फत स्वतंत्र कळविण्यात येणार आहे. निवडलेल्या व्यक्तींकरिता संस्थानमार्फत भक्तनिवासात निवास व प्रसादालयात भोजन व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.

शिर्डी संस्थानच्या या नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रमात सहभागी होण्यासाठी प्रभावशाली डिजिटल कंटेंट निर्मात्यांनी अर्ज येत्या ८ ऑगस्टपूर्वी सादर करावा, असे आवाहन संस्थान व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *