कर्जत । झुंजार न्यूज

कर्जत तालुक्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष अंकुश भैलुमें यांच्या नेतृत्वाखाली १७ दिवसांच्या प्रदीर्घ आंदोलनानंतर एक ऐतिहासिक विजय संपादन झाला आहे. या आंदोलनामुळे तालुक्यातील ९२ गावातील १४८ वस्त्यांना महापुरुषांची नावे देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आला आहे. स्वातंत्र्याच्या ७८ वर्षानंतर मिळालेल्या या यशामुळे वंचित वस्त्यांना नवी ओळख मिळाली आहे.

या आंदोलनात हलगी, शाहिर गर्जा, भीम गर्जा, आराधना, जागरण गोंधळ असे अनेक कलात्मक कार्यक्रम सादर करण्यात आले. मात्र, अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने १२ व्या दिवशी ‘सुई-टाचण वाजवणे’ हा अनोखा कार्यक्रम ठेवण्यात आला. तरीही प्रशासनापर्यंत आवाज न पोहोचल्याने अखेर दोन दिवसांचे बेमुदत उपोषण करण्यात आले. या उपोषणाची दखल घेऊन प्रशासनाने सकारात्मक पाऊल उचलले.

आंदोलक अंकुश भैलुमें यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नामदार रामदास आठवले यांना या परिस्थितीची माहिती देण्यात आली होती. त्यांनी तात्काळ वरिष्ठांना याकडे लक्ष देण्याचे आदेश दिले. त्यानंतर गटविकास अधिकारी अंजिक्य सूर्यवंशी, सहाय्यक अधिकारी प्रमोद जगताप आणि कक्ष अधिकारी दिपक समुद्र यांनी १४८ वस्त्यांना महापुरुषांची नावे देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. रिपाईचे वरिष्ठ नेते विजयराव वाकचौरे आणि श्रीकांत भालेराव यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

या आंदोलनात वृध्द, भूमिहिन, शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीरभाई पठाण, सतिष आल्हाट, अनिल समुद्र, राजेंद्र बोडखे, अरुण नवसे, बाळासाहेब कांबळे, हौसराम मोरे, भिमराव साळवे, लक्ष्मण आखाडे, दत्तात्रय तनपूरे, जाफरभाई पठाण, राजेंद्र कांबळे, महेंद्र साळवे, उमेश गंगावणे, महेश दावडे, मनोहर पोटे, जवान भैलुमें, कुलदीप गंगावणे, राहुल कांबळे, राहुल पोळ आदींनी सक्रिय सहभाग नोंदवला.

 

 

अशी आहेत प्रमुख वस्त्यांना मिळालेली नवीन नावे:

अळसुंदे : मोहन लोंढेवस्ती (अण्णाभाऊ साठे नगर), गोपिनाथ गाडेवस्ती (पंडित जवाहरलाल नगर), राऊआढाववस्ती (भीमनगर), अजिनाथ शेटेवस्ती (महात्मा गांधी नगर), गाडेवस्ती (मदर तेरेसानगर), शामराव गाडेवस्ती (इंदिरा गांधी नगर), पारसेवस्ती (लहुजी नगर), चिंधेवस्ती कोरेगाव रोड (राणी लक्ष्मीबाई नगर), गोरख शेटेवस्ती (कर्मवीर भाऊराव पाटील नगर), गारमळा वस्ती (सिध्दार्थनगर), भिमराव शेटेवस्ती (संत रोहिदास महाराज नगर).

औटैवाडी गावठांण : समतानगर.
खांडवी गावठांण : शाहुनगर.
टाकळी खंडेश्वरी : सपकाळ वस्ती (अण्णाभाऊ साठेनगर), ठोबे-सकटवस्ती (लहुजी नगर), टाकळी गावठांन (रमाई नगर), पवारमळा (रोहिदासनगर).

याव्यतिरिक्त भांबोरा, भोसे, म्हाळगी, शेगुड, मलठण, आनंदवाडी, मांदळी, माहि, मुळेवाडी, वायसेवाडी, लोणीमसदपुर, बेलगांव, बारडगांव दगडी, बहिरोबावाडी, राशीन, राक्षसवाडी बुद्रुक, राक्षसवाडी खुर्द, पिंपळवाडी, बिटकेवाडी, डिकसळ, कोपर्डी, कोकणगांव, कानगुडवाडी, कुळधरण, चिलवडी, चिंचोली काळदात, निमगांव डाकु, निंबोडी, तरडगांव, तोरकडवाडी, खंडाळा, खातगांव, थेरवडी, थेरगांव, गणेशवाडी, गुरवपिंप्री, सोनाळवाडी, सुपे, जलालपुर, नवसरवाडी, नांदगांव, नागापुर, कापरेवाडी, घुमरी, शिंपोरा, चांदे बुद्रुक, बारडगांव सुद्रिक, बेनवडी, कोंभळी, जळकेवाडी, कुंभेफळ आणि धांडेवाडी येथील वस्त्यांनाही विविध महापुरुषांची नावे देण्यात आली आहेत.

 

या निर्णयामुळे वंचित वस्त्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक ओळख मिळाली असून, हा संघर्ष यशस्वी करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन. 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *