पानोडी । झुंजार न्यूज 

डोंगरदऱ्यात वसलेल्या पानोडीच्या ठाकरवाडी येथील सुपुत्र किरण रंगनाथ मधे याने महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेत (MH-SET) दैदिप्यमान यश संपादन करून गावाचे आणि ठाकर समाजाचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

किरण हा ठाकर समाजातील एका सुसंस्कृत कुटुंबात वाढलेला युवक आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर त्याने हे यश खेचून आणले आहे. बालपणापासूनच त्याला शिक्षणाची आवड होती. त्याची अभ्यासूवृत्ती आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्याने M.Sc. Computer हे पदव्युत्तर शिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले.

आता MH-SET सारख्या प्रतिष्ठेच्या परीक्षेत यश मिळवून त्याने आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. हे यश केवळ किरणपुरते मर्यादित नसून, डोंगरदऱ्यात राहणाऱ्या आणि शिक्षणापासून वंचित असलेल्या अनेक मुला-मुलींसाठी प्रेरणादायी आहे.

किरणचे पुढील ध्येय UGC-NET परीक्षा उत्तीर्ण करणे आणि पीएचडी पदवी संपादन करणे हे आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांसाठी त्याला कुटुंबीय, मित्रपरिवार आणि समाजाकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्याच्या यशाने ठाकरवाडी आणि पानोडी गावात आनंदाचे वातावरण आहे. किरणच्या या यशाबद्दल त्याचे परिसरातून अभिनंदन! 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed