कर्जत । झुंझार न्यूज

कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी येथील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते विनोद आखाडे यांनी नुकताच आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांसह तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत त्यांना शुभेच्छा दिल्या. आखाडे यांच्या वाढदिवसानिमित्त आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे.

 

 

गेल्या २० वर्षांपासून विनोद आखाडे हे राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत. सामाजिक कार्यात त्यांचा सिंहाचा वाटा असून, त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले आहेत. कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेश्वरी गाव आणि आसपासच्या परिसरात त्यांचे कार्य नावाजले गेले आहे.

 

 

 

आखाडे यांनी केवळ कर्जत तालुक्यातच नव्हे, तर ठाणे जिल्ह्यातही विविध संघटना आणि आंबेडकर चळवळीत अनेक पदे भूषवली आहेत. त्यांचा चाहता वर्ग मोठा असून, त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

माजी पंचायत समिती सभापती आणि काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे सर्वस्व किरण पाटील यांचे ते निकटवर्तीय मानले जातात, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या कार्याची दखल घेत अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या पुढील वाटचालीस सदिच्छा व्यक्त केल्या.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *