संगमनेर । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावात शनिवारी (दि. ११ ऑक्टोबर) घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या इयत्ता नववीत शिकणाऱ्या ज्योती सखाराम श्रीराम (वय १५) या शालेय विद्यार्थिनीवर बिबट्याने कपाशीच्या शेतात दबा धरून अचानक हल्ला चढवला. मानेला चावा घेत विद्यार्थिनीला शेतात ओढत नेल्याने क्षणभरात गाव हादरले. नागरिकांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पळून गेला, मात्र ज्योतीच्या गळ्याला व मानेला गंभीर जखमा झाल्या. तिला तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

या घटनेची माहिती कळताच राजहंस दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांनी तात्काळ कुटे हॉस्पिटल येथे भेट देऊन जखमी विद्यार्थिनीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी प्रगतीच्या पालकांना दिलासा देत म्हणाले, “ही घटना अत्यंत हृदयद्रावक आहे. निरागस मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात सापडते, ही आपल्यासाठी इशाराच आहे. वनविभागाने या भागात त्वरीत आणि ठोस उपाययोजना केली पाहिजे, अन्यथा भविष्यात नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होईल.”

 

 

 

यावेळी डॉ प्रदिप कुटे यांचीशी प्रगतीच्या तबेतीबाबत विचारणा केली . उमाजी बाबा पुणेकर , भाऊसाहेब खेमनर , तुळशिराम मलगुंडे आदी उपस्थित होते .

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *