संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेत दिवाळी अंक या संकल्पनेला अनन्यसाधारण महत्व आहे. याच परंपरेत संगमनेर येथील प्रसिद्ध व्यंगचित्रकार , लेखक यांनी संपादित केलेला संग्राह्य दिवाळी अंक ” दिवाळी-दसरा विशेषांक ” या दिवाळी अंकाचे प्रकाशन माजी महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरात,माजी आमदार डॉ.सुधीर तांबें, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ.हसमुख जैन , स्नेहलता रुपवते , अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी ,एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात, द्वारकानाथ राठी, डॉ.अरविंद रसाळ, जेष्ठ साहित्यिक डॉ.संतोष खेडलेकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.  

 

 

सुमधुर गीतांची मैफिल दिवाळी पहाट गाणी हा कार्यक्रम संगमनेर इतिहास संशोधन मंडळ, संगमनेर वाचन कट्टा आणि  रसिक संगमनेरकर यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन झाले. यावेळी संगमनेर येथील मोठा रसिक श्रोतावर्ग या कार्यक्रमास उपस्थित होता.
     

 

 

 ‘दिवाळी-दसरा विशेषांक’ या अंकात दिवाळीसण कधीपासून सुरु झाला, दिवाळीच्या पाच दिवसाचे महत्व , दिवाळीसारख्या सणाची साडी परंपरा , दसरा आणि दिवाळीशी निगडीत लोकगीते, विविध प्रांतात दसरा आणि दिवाळीशी निगडित परंपरा याविषयीचे अभ्यासपूर्ण लिखाण डॉ.संतोष खेडलेकर , प्रा.डॉ.अनुश्री राजेंद्र खैरे , सौ.मंगल खेरुड / पेटकर , अनिल सोमणी  यांनी केले आहे.  किसन भाऊ हासे अध्यक्ष ,संपादक व पत्रकार सेवा संघ , महाराष्ट्र राज्य,मुंबई आणि डॉ. संतोष खेडलेकर यांनी या दिवाळी अंकासाठी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *