२४ ऑक्टोबर रोजी वाढदिवस साजरा करणारे रणजितसिंह देशमुख हे केवळ एक व्यक्तीमत्व नसून, सहकार, समाजकारण आणि राजकारणातील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. महानंदा राज्य सहकारी दूध संघाचे माजी चेअरमन आणि संगमनेर तालुका सहकारी दूध संघाचे चेअरमन म्हणून त्यांनी आपल्या कार्याने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

सहज आणि विनम्र स्वभाव
रणजितसिंह देशमुख यांचा स्वभाव अत्यंत हसमुख आणि मनमिळाऊ आहे. त्यांच्यात उच्च पदावर असल्याचा कोणताही गर्व दिसून येत नाही. ते प्रत्येक व्यक्तीशी, मग तो छोटा असो वा मोठा, गरीब असो वा श्रीमंत, आपुलकीने आणि आदराने बोलतात. मित्रपरिवार, कार्यकर्ते, कामगार या सर्वांबद्दल त्यांना आस्था आहे. त्यांच्या या सहज स्वभावामुळे ते सर्वांचे लाडके आहेत.

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरी
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली रणजितसिंह देशमुख यांनी सहकार क्षेत्रात आपले एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. महानंदा राज्य सहकारी दूध संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्यापासून त्यांनी अनेक संकटातून महानंदाला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. तेथील कामगारांना त्यांनी एक आशेचा किरण दाखवला. कोरोनासारख्या महाभयंकर संकटातही त्यांनी दूध उत्पादक, शेतकरी आणि कामगार यांना दिलासा देण्याचे काम केले.

शिवराज्य संघटना आणि युवा सक्षमीकरण
रणजितसिंह देशमुख यांनी युवकांना संघटित करत ‘शिवराज्य संघटना’ स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा वारसा युवकांनी आत्मसात करावा असे आवाहन ते सातत्याने करतात. युवकांना योग्य दिशा देऊन सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करण्याचे काम ते करत आहेत

पंढरपूरच्या विठ्ठलावर श्रद्धा आणि राजहंस दूध संघातील मंदिर
रणजितसिंह देशमुख यांची पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणीवर अपार श्रद्धा आहे. दरवर्षी ते वाढदिवसानिमित्त सहकुटुंब पंढरपूरला जाऊन विठ्ठल-रुक्मिणीची पूजाअर्चा करतात आणि दर्शन घेतात. त्यांच्या या श्रद्धेमुळे त्यांनी राजहंस दूध संघात विठ्ठल-रुक्मिणीचे सुंदर मंदिर बांधले आहे. राजहंस दूध संघातील कोणत्याही नवीन कामाची सुरुवात माऊलीच्या आरतीनेच होते, हे त्यांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे.

राजकीय क्षेत्रात संधीची चर्चा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहत असताना, मतदारांमध्ये एकाच गोष्टीची चर्चा आहे – सुसंस्कृत, प्रामाणिक आणि सामाजिक दायित्व निभावणाऱ्या व्यक्तींनाच राजकीय क्षेत्रात संधी मिळाली पाहिजे. या पार्श्वभूमीवर, जोर्वे गटातून रणजितसिंह देशमुख यांनीच उमेदवारी करावी अशी जोरदार मागणी होत आहे. त्यांच्या कामाची, त्यांच्या स्वभावाची आणि त्यांच्या स्वच्छ प्रतिमेची ही पोचपावतीच आहे

