उंबरी बाळापूर येथील शेतकऱ्यांची तात्काळ नुकसान भरपाईची मागणी

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर गावातील अनेक शेतकरी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीच्या भरपाईपासून वंचित राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तात्काळ भरपाई मिळावी यासाठी संगमनेरच्या तहसीलदारांना निवेदन सादर केले आहे.

 

 

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत झालेल्या मुसळधार पावसामुळे उंबरी आणि बाळापूर परिसरातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असले तरी, अनेक शेतकरी बांधवांना अद्याप नुकसान भरपाई मिळालेली नाही. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

शेतकऱ्यांनी तहसीलदारांना विनंती केली आहे की, त्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून जे शेतकरी बांधव भरपाईपासून वंचित आहेत, त्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईचे पैसे मिळवून द्यावेत.

 

 

या निवेदनावेळी गणेश भुसाळ, निलेश निर्मळ, संदीप भुसाळ, अतुल भुसाळ, रवींद्र शेळके, विलास उंबरकर, प्रशांत उंबरकर यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *