खा. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष उपक्रम
रहीमपूर । झुंझार न्यूज
अहमदनगर जिल्ह्याचे लोकप्रिय नेतृत्व आणि राज्याचे महसूल मंत्री नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आशीर्वादाने, युवा नेते खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रहीमपूर येथील महिला भगिनींसाठी ‘मोफत देवदर्शन’ यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांतर्गत रहीमपूर गावातील महिलांना जिल्ह्यातील प्रमुख धार्मिक स्थळांचे दर्शन घडवले जाणार आहे. यामध्ये प्रसिद्ध शनिशिंगणापूर, श्री क्षेत्र रेणुकामाता (काचेचे मंदिर), श्री क्षेत्र मोहटादेवी, श्री क्षेत्र कानिफनाथ महाराज (मढी) आणि श्री क्षेत्र माळींबा गड (मच्छिंद्रनाथ) या पवित्र तीर्थक्षेत्रांचा समावेश आहे.
या धार्मिक सहलीचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते श्री. सचिन शिंदे पाटील आणि श्री. पप्पू शेठ गाढे पाटील यांनी केले आहे. डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवण्याच्या हेतूने आणि गावातील महिलांना विरंगुळा व तीर्थाटनाचा आनंद मिळावा, यासाठी हा पुढाकार घेण्यात आला आहे.
ही यात्रा सोमवारी, दिनांक २४ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. यात्रेसाठी बस सुटण्याचे ठिकाण रहीमपूर ग्रामपंचायत कार्यालय हे असून, सकाळी ठीक ५:०० वाजता गाड्या मार्गस्थ होणार आहेत.
वेळेचे नियोजन काटेकोर असल्याने गावातील सर्व इच्छुक महिला भगिनींनी सोमवारी पहाटे ५ वाजण्यापूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ उपस्थित राहावे, जेणेकरून सर्व देवस्थानांचे दर्शन वेळेत पूर्ण करता येईल, असे आवाहन आयोजक सचिन शिंदे पाटील व पप्पू शेठ गाढे पाटील यांनी केले आहे. या उपक्रमामुळे रहीमपूरच्या महिला वर्गात आनंदाचे वातावरण असून, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
