आश्वी : झुंझार न्यूज

तालुक्यातील दाढ खुर्द (दाढ फाटा) येथील पावनभूमीत प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रामस्थ आणि पंचक्रोशीच्या सहकार्यातून साकारला जाणारा हा १९ वा अखंड हरिनाम सप्ताह मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२५ रोजच सुरू होऊन मंगळवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी सांगता होणार आहे.

ब्रम्हलिन सद्गुरू माणिकगिरी महाराज आणि बिरोबा महाराज यांच्या कृपेने व ह.भ.प. महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज (श्री क्षेत्र वरवंडी, उंबरेश्वर) यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत आहे. या सप्ताहामुळे संपूर्ण दाढ खुर्द परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण होणार आहे.

 

महंत रामगिरीजी महाराजांची उपस्थिती

या अखंड हरिनाम सप्ताहाचे मुख्य आकर्षण म्हणजे सप्ताह कालावधीत सरला बेटचे अधिपती महंत परमपूज्य रामगिरीजी महाराज यांचे दर्शन व प्रवचन भाविकांना लाभणार आहे.

 

अशी असेल सप्ताहाची दिनचर्या

सप्ताहादरम्यान दररोज पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ४ ते ५ प्रवचन, सायंकाळी ५ ते ६ हरिपाठ, सायंकाळी ६ ते ७ डफ गजर आणि रात्री ७ ते ९ कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद आणि हरिजागर असे भरगच्च धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

नामवंत कीर्तनकारांची मांदियाळी

या भक्ती यज्ञात महाराष्ट्रातील अनेक दिग्गज कीर्तनकार आणि प्रवचनकार आपली सेवा रुजू करणार आहेत.

दि. २५/११ (मंगळवार): ह.भ.प. ब्रम्हचारी सुधाकर शास्त्री मुळे (त्र्यंबकेश्वर) – कीर्तन.
दि. २६/११ (बुधवार): ह.भ.प. श्रीहरी महाराज वैष्णव (जालना) – कीर्तन.
दि. २७/११ (गुरुवार): विद्वतरत्न ह.भ.प. एकनाथ महाराज सांगोलकर (आळंदी) – कीर्तन.
दि. २८/११ (शुक्रवार): ह.भ.प. मधुसुदन महाराज मोगल (शिऊर) – कीर्तन.
दि. २९/११ (शनिवार): रामायणाचार्य ह.भ.प. परशुराम महाराज अनर्थे (कोपरगाव) – कीर्तन.
दि. ३०/११ (रविवार): जगद्गुरू द्वाराचार्य विद्यावाचस्पती डॉ. रामकृष्णदासजी महाराज लहवितकर (नाशिक) – कीर्तन.
दि. ०१/१२ (सोमवार): ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे शास्त्रीजी (आळंदी) – कीर्तन.

तसेच दररोज दुपारी प्रवचन सेवा ह.भ.प. चांगदेव महाराज नेहे, बाळासाहेब महाराज उंबरकर, बाळकृष्ण महाराज कांबळे, शांताराम महाराज जोरी, संतोष महाराज गाडेकर, सुनील महाराज पवार आणि प्रकाश महाराज आव्हाड यांच्या वतीने दिली जाणार आहे.


काल्याचे कीर्तन व महाप्रसाद

सप्ताहाची सांगता मंगळवार, दिनांक ०२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प. महंत गुरुवर्य दत्तगिरीजी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.


तरी या अनमोल आध्यात्मिक पर्वाचा आणि ज्ञानेश्वरी पारायणाचा लाभ घेण्यासाठी दाढ खुर्द व पंचक्रोशीतील सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समस्त ग्रामस्थ दाढ खुर्द आणि पंचक्रोशीच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed