संगमनेर । झुंझार न्यूज
गुणवत्ता पूर्ण शिक्षणामुळे अमृतवाहिनी मॉडेल स्कूलचे अनेक माजी विद्यार्थी देशात आणि विदेशात चांगल्या पदावर काम करत असून हे संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे मा. शिक्षणमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले असून अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध कला, संस्कृतीच्या अविष्काराने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले.

अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या विद्यार्थ्यांचा अमृतरंग हा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम संपन्न झाला यावेळी व्यासपीठावर माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख, डॉ जयश्रीताई थोरात, श्रीमती सुधीरा गुळवे ,श्रीमती भाग्यश्री दसपुते, डॉ. शिल्पा सोनंबेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य आशिष कुमार व अमृतवाहिनी संस्थेचे सर्व प्राचार्य उपस्थित होते.

यावेळी अमृतवाहिनी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, ढोल पथक, डंबेल्स, व योगाचे विविध प्रात्यक्षिक सादर करून मान्यवरांचे स्वागत केले त्याचबरोबर व्यासपीठावर समूह नृत्य, गरबा, पंजाबी नृत्य, आदिवासी नृत्य, जागरण गोंधळ, देवीचे नृत्य, देशभक्तीपर गीते, आणि फॅशन शो नाटिकांमधून विद्यार्थ्यांनी आपल्या कलाविष्कारांचे दर्शन घडविले.

पहिली ते बारावी मधील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक गीताला पालक व रसिकांनी भरभरून दाद दिली.
यावेळी मा शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण इंग्रजी शिक्षणाची सुविधा असावी याकरता मॉडेल्सची स्थापना केली. मॉडेल स्कूलच्या गुणवत्तपूर्ण शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी यूपीएससी एमपीएससी पास झाले असून देशात विदेशात चांगल्या पदांवर कार्यरत आहे. इंग्रजी शिक्षण ही काळाची गरज आहे. इंग्रजी मुळे जगभरात तुम्हाला करिअरच्या संधी खुल्या झाल्या आहेत. पालकांनी आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यास आणि मैदानी खेळ याकरता लक्ष द्यावे असे आवाहन त्यांनी केले.
तर डॉ.जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, शालेय जीवन हे अत्यंत आनंदाची असून याच काळामध्ये खरा विद्यार्थी घडतो. मोबाईल पासून आपल्या पाल्यांना पालकांनी लांब ठेवावे. आरोग्य अत्यंत महत्त्वाची असून सदृढ बालक आणि निरोगी आरोग्यासाठी मैदानी खेळ ही गरजेचे आहे अमृतवाहिनी मॉडेल स्कूल मध्ये सातत्याने विविध उपक्रमाचे आयोजन होत असून यामध्ये सर्वांनी कायम सहभाग नोंदवा असे आवाहन करणे केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आशिष कुमार यांनी केले. यावेळी अमृतवाहिनी संस्थेतील सर्व विभाग प्रमुख शिक्षक सर्व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



