पवार, अभंग, कासार, सातपुते, पठाण,पगडाल, शेख यांची वर्णी

 

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर नगरपालिकेच्या विविध विषय समित्यांची निवड प्रक्रिया काल सोमवारी पार पडली.बांधकाम आरोग्य, शिक्षण, पाणी पुरवठा यासह विविध समित्यांच्या सभापतीची निवड करण्यात आली. यामुळे गेल्या अनेक दिवसा पासूनची प्रतीक्षा संपली असून आता पालिकेच्या कामकाजात सुधारणा होईल अशी नागरिक व्यक्त करत आहे.

 

 

पालिकेत संगमनेर सेवा समितीची सत्ता आल्यानंतर विषय समितीच्या निवडीकडे लक्ष लागून राहिले होते.
सोमवारी पालिकेच्या रामकृष्ण सभागृहात तहसीलदार धीरज मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. यावेळी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आणि मुख्याधिकारी दयानंद गोरे उपस्थित होते.


सत्ता असल्याने बैठकीत सर्व निवडी बिनविरोध करण्यात आल्या. स्थायी समितीच्या पदसिद्ध सभापती पदी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून शेख नूरमोहम्मद, किशोर पवार, अनुराधा सातपुते, सरोजना पगडाल, किशोर टोकसे, डॉ. दानिशखान पठाण, दिलीप पुंड व विश्वास मुर्तडक यांचा समावेश आहे.

सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापती पदी किशोर हिरालाल पवार यांची निवड झाली असून या समितीत सौरभ कासार, गजेंद्र अभंग, गणेश गुंजाळ, अमजदखान पठाण, शैलेश कलंत्री, नंदा गरुडकर, योगेश जाजू व साक्षी सूर्यवंशी हे सदस्य आहे.
शिक्षण समितीच्या सभापती पदी डॉ. अनुराधा सातपुते तर सदस्य असून सीमा खटाटे, वनिता गाडे, गणेश गुंजाळ, प्रियांका शाह, नंदा गरुडकर, शेख दिलशाद, रचना मालपाणी व साक्षी सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे.

स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापती पदाची जबाबदारी किशोर टोकसे तर सदस्य प्रियांका शाह, शैलेश कलंत्री, सीमा खटाटे, सौरभ कासार, शोभा पवार, अमजदखान पठाण, जावेद खान पठाण व साक्षी सूर्यवंशी.
पाणीपुरवठा आणि जलनिस्सारण समितीच्या सभापती पदी मुजीबखान पठाण तर सदस्य भारत बोऱ्हाडे, अर्चना दिघे, शोभा पवार, मालती डाके, नितीन अभंग, विजया गुंजाळ, सोमेश्वर दिवटे व साक्षी सूर्यवंशी यांचा समावेश आहे.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी सरोजना पगडाल तर उपसभापती पदी प्रिया काशीद यांची निवड झाली आहे. या समितीमध्ये अर्चना दिघे, वनिता गाडे, दिपाली पंचारिया, विजया गुंजाळ, शकीला बेग, रचना मालपाणी व साक्षी सूर्यवंशी हे सदस्य आहे.


नियोजन आणि विकास समितीचे पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष नूरमोहम्मद शेख असून भारत बोऱ्हाडे, गजेंद्र अभंग, मालती डाके, नितीन अभंग, दिपाली पंचारिया, योगेश जाजू, जावेद खान पठाण व साक्षी सूर्यवंशी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आता पालिकेच्या कारभारात सुधारणा होऊन नागरिकांचे मूलभूत प्रश्न सुटण्यास मदत होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

 

सभागृहात प्रशासनाच्या कामातील ढिसाळपणा पहिल्याच बैठकीत समोर आला. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी उशिरापर्यंत चालली. मात्र निवडी जाहीर झाल्यानंतर सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित अधिकारी किंवा पदाधिकाऱ्यांकडून माहीती माध्यमांना देण्यात आली नाही. अखेर मुख्याधिकारी दयानंद गोरे यांचेशी संपर्क साधला असता मिटिंग मध्ये होतो असे सांगत प्रतिसाद दिला.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *