वाळू तस्करांची अजब शक्कल,
वाळू तस्करांकडून दहशतीसाठी सोशल मीडियावर रिल्स
संगमनेर तालुक्यात चालले काय, सर्वसामान्य नागरिकांचा सवाल
संगमनेर । झुंझार न्यूज
मागील एक वर्षापासून संगमनेर तालुक्यामध्ये अमली पदार्थांची तस्करी दहशत दादागिरी दडपशाही सुरू असून सत्ताधाऱ्यांच्या आशीर्वादाने वाळू तस्करांची मगरुरी वाढली आहे. बिन बोभाट वाळू तस्करी करून ते रिल्स बनवत असून प्रशासनासह नागरिकांवर दडपशाही निर्माण करत असल्याने संगमनेर तालुक्यात चालले काय असा सर्वसामान्य नागरिकांनी प्रश्न विचारला आहे.

प्रवरा नदीच्या काठी विविध गावांमधून वाळू तस्करांनी नवी शक्कल शोधून वीस पंचवीस मोटरसायकल एकत्र येऊन मोटारसायकल वरून बिन बोभाट वाळू तस्करी सुरू आहे. या वाळू तस्करीचे रिल्स सोशल मीडिया टाकले जात असून आम्हाला आशीर्वाद आहे आम्ही कुणाला घाबरत नाही. असा संदेश देत असून यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांची दमदाटी सुरू झाली आहे.
.

प्रशासन हे सर्व डोळे झाकून पाहत असून त्यांचा आशीर्वाद आहे की काय असा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. पालकमंत्री ,नवीन लोकप्रतिनिधी यांचे कार्यकर्ते म्हणून ही मंडळी काम करत असून स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते झाले आहेत. या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांना चाप लावणे अत्यंत गरजेचे आहे.

कारण वाळू तस्करीतून मिळालेला अवैध पैसा हा व्यसनासाठी वापरला जात असून यामुळे तरुण पिढी बरबाद होत आहे .संगमनेर तालुक्याला हा मोठा धोका निर्माण झाला असून प्रशासन आणि पोलीस प्रशासन हे सर्व बिन बोभाट पाहत आहे.

आता नागरिकच जागरूक झाले असून सोशल मीडियावरील रिल्स बनवणारे सर्व वाळू तस्कर आणि त्यांना पाठीशी घालणारे विद्यमान सत्ताधारी यांच्या विरोधात जनता एकवटली असून तातडीने अशा गुंड व तस्करांवर कारवाई करा अन्यथा तालुका बंद करण्यात येईल असा इशारा प्रवरा काठ गावांनी दिला आहे.

सोशल मीडियावर तस्करांचा धुमाकूळ
संगमनेर तालुक्यातील वाळू तस्कर हे विना नंबर प्लेट वाहन वाळू तस्करीसाठी वापरत असून त्यांचे डंपर गाड्या व मोटरसायकल या विना नंबर असून ते बिन बोभाट व्हिडिओ व रिल्स करत असून त्या समाज माध्यमांवर टाकत आहे .जेणेकरून या स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रशासन व सामान्य नागरिकांवर धाक निर्माण होईल याकरता ते रिल्स टाकत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक भयग्रस्त झाले आहे
