आश्वी खुर्द येथे शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या उपस्थितीत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात संपन्न
आश्वी । झुंझार न्यूज
महिला या शब्दामध्ये म म्हणजे महानता, हि म्हणजे हिंमत आणि ला म्हणजे लाजाळूपणा—या तिन्ही गुणांचे सुंदर संमिश्रण आहे. मनात दृढ श्रद्धा असेल, तर कोणतेही अशक्य कार्य शक्य होते, हे बालब्रह्मचारी शिवभक्त प.पु. पूंजाआई यांनी आपल्या तपश्चर्येने व जीवनकार्याने सिद्ध करून दाखवले आहे. महादेवावरील त्यांची अपार श्रद्धा आजही समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी केले.

आश्वी खुर्द (ता. संगमनेर) येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या बालब्रह्मचारी शिवभक्त प.पु. पूंजाआई यांच्या ३१व्या पुण्यतिथीनिमित्त पूंजाआई मंदिर प्रांगणात आयोजित त्रिदिनी सप्ताह सोहळ्यानिमित्त महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील व निलमताई खताळ पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत महिलांसाठी वस्त्रदान व हळदी-कुंकू कार्यक्रम उत्साहात पार पडला.

भाऊ फाउंडेशनचे अध्यक्ष विकास गायकवाड यांनी वस्त्रदान केले, तर हळदी-कुंकूचे वाण योगेश लुकंड यांनी दिले. या कार्यक्रमास सरपंच अलका गायकवाड, ह.भ.प. ज्योतीताई पवार, लता यादव, सुप्रिया भडकवाड, विमल मेहेरे, माया कहार, राधा कहार, लता कांबळे, गौरी लंवाडे, शोभा गवळी, वैशाली बिडवे, सोनाली गायकवाड, कल्पना पऱ्हे, रंजना गायकवाड, योगिता सोनवणे, पूर्णिमा पंडुरे, माई कचेरिया, पूजा भडकवाड यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
शालिनीताई विखे पाटील पुढे म्हणाल्या की, पारायण वाचनामुळे मनामध्ये आध्यात्मिक, धार्मिक व सकारात्मक विचारांची निर्मिती होते. संक्रांतीनिमित्त तिळगूळ वाटप असो किंवा हळदी-कुंकू कार्यक्रम—अशा प्रसंगी महिला एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करतात. यामुळे सामाजिक सलोखा, स्नेहभाव आणि सांस्कृतिक मूल्ये अधिक दृढ होतात.
![]()
बालब्रह्मचारी शिवभक्त प.पु. पूंजाआई यांच्या अदृश्य शक्तीच्या आशीर्वादामुळे सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती आज आमदार होऊ शकतो. देवभक्तीच्या बळावर संगमनेर तालुक्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी आमदार अमोल खताळ पाटील सक्षमपणे लढा देत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

पठार भाग व तळेगाव परिसरातील शेतकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच डॉ. सुजय विखे पाटील यांच्या सहकार्याने सातत्याने प्रयत्न सुरू असल्याची माहिती निलमताई खताळ पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमास संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, नेवासाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी भेट देऊन पूंजाआईंचे दर्शन घेतले. याप्रसंगी ह.भ.प. सुनील महाराज पवार यांच्या उपस्थितीत पूंजाआई महात्म्य पारायण वाचन सोहळा भाविकांच्या उपस्थितीत भक्तिभावात सुरू आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संचालक अॅड. अनिलराव भोसले, बापूसाहेब गायकवाड, उपसरपंच बाबा भवर, सोपान सोनवणे, पत्रकार संजय गायकवाड, कैलास गायकवाड, संतोष भडकवाड, शरद सोनवणे, बाबा भोसले, मनोज कहार, कृष्णा कहार, मनोज मेहेरे, आशिष गायकवाड, गौरव मुंतोडे, गोरख गव्हाणे, दगडू गायकवाड, अतुल भोकरे, संजय देशमुख, संजय भोसले, उमेश सालकर, अमोल गायकवाड, दामू गायकवाड, संजय साबळे, तान्हाजी गायकवाड, अमोल भडकवाड यांनी विशेष योगदान दिले.

