आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील आश्वी येथे चतुर्विध संघाच्या उपस्थितीत जैन संत आचार्य प. पूज्य मुनीचंद्रसुरीश्वरजी महाराज साहेब यांच्यासह ७० साधू-साध्वीजी आणि प. पूज्य चंदन बालाजी महाराज साहेब व पद्मावतीजी महाराज साहेब (ठाणा ७) यांचे अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण आश्वी शहर ‘जैनम जयति शासनम’च्या जयघोषाने दुमदुमून गेले होते.

 

Oplus_131072

जैन संतांचे आगमन सर्वप्रथम मांची हिल, आश्वी येथील ‘उज्ज्वल गोरक्षण केंद्रात’ झाले. यावेळी संतांनी गोमातेचे दर्शन घेऊन केंद्राच्या कार्याची पाहणी केली. अहिंसा आणि जीवदयेचा संदेश देणाऱ्या जैन धर्मात गोसेवेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याने, संतांच्या या भेटीने गोशाळा परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.

शुक्रवारी सकाळी आश्वी गावातील जैन श्रावक आणि श्राविका मोठ्या संख्येने आचार्य श्रींच्या स्वागतासाठी सामोरे गेले. गावातून संतांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या स्वागतासाठी गावातील मुख्य रस्त्यांवर आकर्षक सडा-रांगोळी काढण्यात आली होती.

मिरवणुकीच्या अग्रभागी पारंपारिक बँड पथक आणि संबळ वाद्य होते. त्यामागे मंगल कलश घेतलेल्या महिला, जैन ध्वज घेतलेले युवक-युवती आणि पांढऱ्या शुभ्र वस्त्रात उपस्थित असलेले श्रावक सहभागी झाले होते. ही मिरवणूक उंबरी रोडने मार्गक्रमण करत गावातील जैन धर्म स्थानकात आली.

या सोहळ्यासाठी राहुरी येथील डॉ. सुवर्णाताई गोलेच्चा, सुभाष सावज, लोणी येथील बाळासाहेब लोढा, महावीर शिंगी, धिरज भंडारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

या ऐतिहासिक सोहळ्याचे नियोजन श्रावक संघाचे अध्यक्ष सुम्मतीलाल गांधी, उपाध्यक्ष सुशील भंडारी, प्रवरा बँकेचे संचालक संजय गांधी, योगेश रातडीया आणि किशोर पटवा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.


यावेळी भूषण भंडारी, अथर्व रातडीया, सौरभ भंडारी, संयम लुंकड, युग लुंकड, अनिकेत पटवा, शुभम बोरा, श्रेणीक बोरा, शुभम पटवा, ईश्वर भंडारी, रोहित भंडारी, अभिजीत गांधी, निलेश चोपडा, मिलिंद बोरा, निलेश रातडीया, पंकज नाके, राजेंद्र लुणीया, योगेश लुकंड, सागर रातडीया, विलास भंडारी, प्रशांत गांधी, प्रीतम गांधी, संदीप बोरा, नितीन गांधी, अमित भंडारी, रवींद्र बिहाणी, सतिष गांधी, आश्वीन मुथ्था, समीर गांधी, मनोज पटवा, दिपक बोरा, गौतम रातडीया, रतीलाल रातडीया, अविनाश गांधी व श्रावक संघाच्या सर्व सदस्यांनी संतांचे स्वागत केले.


या मंगलप्रसंगी आश्वी व परिसरातील जैन धर्मीय बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संतांच्या दर्शनासाठी ग्रामस्थांनीही मोठी गर्दी केली होती.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed