संगमनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिव जन्मोत्सव सोहळ्याचे संपन्न झाला. यावेळी उपमुख्यमंत्री व क्रीडा प्रेमी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.
सालाबादप्रमाणे याही वर्षी संगमनेर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वतीने गुरुवारी दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी शिव जन्मोत्सव अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य दिव्य अशा पुतळ्याची पूजन करण्यात आले. तसेच उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस अभिवादन आले. त्यानंतर शिवभक्तांना अखिल भारतीय सह्याद्री छावा वा संघटनेच्या वतीने खिचडीच्या महाप्रसादचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप अण्णा शिंदे, जिल्हाध्यक्ष कपिल भाऊ पवार, शहराध्यक्ष प्रवीण भाऊ कानवडे,.दत्तात्रय भाऊ म्हस्के, अशोक भाऊ काळे, नितीन अहिरे, प्रसाद काठे , देवराज थोरात, संतोष भुजबळ , प्रसाद गोरे, अमित (बंटी) मंडलिक,.दिनेश डफेदार, आशिष ताजणे,.प्रतीक गाडेकर, वैशालीताई राऊत रोहिणी राऊत ,अमृता कोळपकर, पायल ताई ताजणे, सरलाताई भुजबळ, संध्याताई खरे, प्रिया खरे, सार्थक वाघमारे, नवनाथ म्हस्के, ऋषीप्रसाद लहामगे, राहुल राऊत, दिनकर घुले यांसह शिव भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.