माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ शालिनीताई विखे पाटील यांच्याकडून शात्वन

तर अंत्यविधीसाठी सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह मोठा जनसमुदाय 

आश्वी । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील व शिर्डी विधानसभा मतदार संघातील पिंप्री लौकी अजमपुर येथील ज्येष्ठ व्यक्तिमत्व तथा प्रगतशिल शेतकरी स्व. किसनराव कारभारी गिते (पाटील) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८५ वर्षे होते. त्यांच्या निधनाने पिंप्री लौकी अजमपुर परिसरात शोककळा पसरली असून एका मार्गदर्शक आणि कुटुंबप्रमुखाला मुकल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

साधे राहणीमान आणि सामाजिक मूल्यांची जोपासना
स्व. किसनराव गिते हे आपल्या अत्यंत साध्या आणि मनमिळावू स्वभावासाठी संपूर्ण परिसरात परिचित होते. त्यांनी आयुष्यभर सामाजिक मूल्यांची जोपासना केली. शेती व्यवसायासोबतच त्यांनी समाजकारणात नेहमीच मोलाचे योगदान दिले. गिते परिवाराचा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात मोठा वावर असून, किसनराव गिते यांच्याच मार्गदर्शनाखाली या परिवाराने गावात विविध विकासकामे आणि लोकोपयोगी सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत.

राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती
स्व. किसनराव गिते हे भाजपा जिल्हा सरचिटणीस भारतराव पाटील गिते आणि भाऊसाहेब गिते यांचे वडील होत. तसेच पिंप्री गावच्या विद्यमान सरपंच सौ. संगिता गिते आणि उद्योजिका ज्योती गिते यांचे ते सासरे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी हळहळ व्यक्त केली.

जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी गिते परिवाराची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि किसनराव गिते यांच्या आठवणींना उजाळा दिला.

किसनराव गिते यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी भगवान इलग पाटील, निवृत्ती सांगळे, राजेंद्र चकोर, सुरेश नागरे, प्रमोद बोंद्रे, शिवाजी बोंद्रे, अशोक गीते, रमेश सांगळे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

परिसरातील सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या किसनराव पाटील यांच्या निधनाने गावच्या सामाजिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed