शिवचरित्र हा केवळ इतिहास नसून तो जगण्याचा आधार आहे. ज्या घरात शिवचरित्र असेल, तेथे कोणतीही दहशत टिकू शकणार नाही. शिवरायांचे विचार आत्मसात केल्यास समाजात स्वाभिमान जागृत होईल आणि आत्महत्येसारख्या घटनांना आळा बसेल,” असे प्रतिपादन शिवस्वराज्य सेवाभावी संस्थेचे प्रवर्तक अध्यक्ष केतन लव्हाटे यांनी केले.
शिवस्वराज्य सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य, चिंचपूर यांच्या वतीने ‘मोहीम २०२५: शिवचरित्र घरोघरी देवघरी’ या उपक्रमांतर्गत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शिवजयंती निमित्त भव्य निबंध स्पर्धा आणि शिवचरित्र वाटप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
१०० स्पर्धकांचा सहभाग आणि पारितोषिक वितरण शिवजयंती निमित्त आयोजित छत्रपती शिवाजी महाराज निबंध स्पर्धेत १०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम क्रमांकापासून पुढील विजेत्यांना प्रशस्तीपत्रक आणि ‘शिवचरित्र’ ग्रंथ देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले पोवाडे आणि शिवगर्जनांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता.
शिवचरित्रावर आधारित कविता आणि मार्गदर्शन संस्थेचे प्रवर्तक अध्यक्ष केतन लव्हाटे यांनी स्वत: रचिलेली ‘शिवचरित्र’ नावाची कविता सादर केली
“दहशतीचा नाश आहे शिवचरित्र, अंधारातील लख्ख प्रकाश आहे शिवचरित्र. पराभूत मनाचा आधार आहे शिवचरित्र, जीवनाचा आधार आहे शिवचरित्र. संपूर्ण हिंदुत्वाचे आहे चरित्र, साखळदंड तोडण्याचा पराक्रम आहे शिवचरित्र, पराक्रमाचा इतिहास आहे शिवचरित्र.”
यावेळी बोलताना लव्हाटे यांनी सांगितले की, ही मोहीम अविरत सुरूच राहील जेणेकरून विद्यार्थी कष्टाळू होतील आणि एक कर्तव्यनिष्ठ समाज घडेल. संस्थेचे अध्यक्ष अविनाश तांबे यांनी महाराजांनी अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती कशी केली, यावर प्रकाश टाकला.
या सोहळ्याप्रसंगी प्रवरा शाळेचे मुख्याध्यापक नंदू जाधव सर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रवरा सहकारी कारखान्याचे माजी चेअरमन कैलास नाना तांबे, प्रवरा सहकारी बँकेचे संचालक गीताराम अण्णा तांबे, प्रवरा शाळेचे कमिटी अध्यक्ष व माजी पोलीस पाटील लक्ष्मण पाटील तांबे, माजी सरपंच अरुण तात्या लव्हाटे, माजी सरपंच गीताराम पवार, मेजर लोखंडे पाटील, शंकर तांबे आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
या मोहिमेअंतर्गत ५५ शिवचरित्र ग्रंथांचे वाटप विविध वयोगटातील नागरिकांना करण्यात आले. तसेच निमगाव जाळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच ज्ञानेश्वर डेंगळे व सदस्य वैभव वदक, आश्वी येथील विकास गायकवाड, पोलीस गोपाळे दादा, औरंगापूर येथील मानवाधिकार संघाचे सरचिटणीस दत्तू पंत तळोले यांना शिवचरित्र भेट देण्यात आले. यासोबतच जिल्हा परिषद शाळा चिंचपूर आणि प्रवरा शाळा चिंचपूर यांनाही संस्थेच्या वतीने शिवचरित्र प्रदान करण्यात आले.