चांगल्या माणसाला विरोध होतोचं तेव्हा रडू जगण्या पेक्षा लढू जगा समाज्याला व्यक्ती मेल्या नंतर किंमत कळते. संगमनेर : झुंजार न्यूज या रयतेच्या राज्यात शेतकरी , वारकरी , महीलांसह प्रत्येकांचा विचार करत जिजाऊने शिवाजीराजेंना संस्कारामय घडवून स्वराज निर्माण करण्याचा पुढाकार घेतल्यानेचं आज मणुष्य भयमुक्त झाले असून ज्या राज्यात जिजाऊ , शिवराय व संभाजीराजे निर्माण झाले त्याचं राज्यात माता – पिता व मुलांमधील संवाद कमी झाल्याने आई – वडीलांना आश्रमात जाण्याची वेळ येत असल्याचे दुदैव बाब असल्याचे शिवश्री ह भ प रविंद्र महाराज आगलावे यांनी शिवकिर्तनातून आपली खंत व्यक्त केली .
संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे एकता युवा मंचच्या माध्यमातून तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी शिवश्री आगलावे बोलत होते एकता युवा मंचच्या शंभर युवा कार्यकर्त्यानी शिवरायाच्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्यावरुन शिवज्योत आणली या शिवज्योतीचे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहात स्वागत करुन दर्शन घेण्यात येवून वेताळ बाबा ते हनुमान मंदिरापर्यत शिवज्योत वाजत – गाजत आणली इतर खर्चाला फाटा देत ग्रामस्थांकरिता प्रबोधन म्हणून शिवकिर्तन व महाभोजनाचा कार्यक्रम ठेवल्याने एकता युवा मंचच्या कार्यकर्त्याचे सर्वस्तरावर कौतुक झाले . यावेळी शिवश्री रविंद्र आगलावे पुढे म्हणाले की , छत्रपती शिवाजी महाराज यांनी भ्रष्टाचार मुक्त समाज केला. तसेच महिलांचे रक्षण करणारे राज्य त्यांनी स्थापन केले. महिलांना प्रतिष्ठा निर्माण करून दिली. मानवतेचा कल्याणकारी राज्य छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांची देवांविषयी श्रद्धा होती अंधश्रद्धा नव्हती. तसेच महाराजांनी विज्ञानवादी समाज आणि भयमुक्त समाज निर्माण केल्यानेचं दिंड्यांना , किर्तनाला स्वायत्तता प्राप्त झाली तर महीला हया मुक्तपणे फिरु लागल्याचे कौतुकास्तव बाब आहे
स्वराज्य स्थापन करताना शिवराय व मावळ्यांना मोठ्या संकटांना तोड दयावे लागल्यानेचं मणुष्य भयमुक्त झाले तसे छत्रपती पुन्हा ४०० वर्षात का घडले नाही ? असा सवाल करत घरा घरात जिजाऊ निर्माण झाल्या शिवाय दारादारात छत्रपती निर्माण होणार नाही ‘ पुत्र असावे असा वाटत असेल तर संभाजीराजे वाचा ! स्वराज्य निर्माण करण्याचे खरे स्वप्न शहाजीराजे व जिजाऊचे होते त्यातूनचं शिवबा घडले . आज मात्र घरा घरात संवाद संपल्याने आई – वडील आश्रमात तर मुले परदेशात ही स्थिती झाली .तेव्हा आई – वडीलांनी मुलांना वेळ देवून संवाद ठेवा तरचं मुलांवर चांगले संस्कार होतील . परिस्थिती बदलत असून जैशी करणी , वैशी भरणी नुसार मुलांसमोर व्यसने करु नका मुलेही ही तशीचं वागतील . मानसिकता बदला ! जिजाऊ , शिवराय , तुकाराम पुन्हा होणे नाही . या सर्वाना भयानक त्रास झाला , चांगल्या माणसाला विरोध होतोचं तेव्हा रडू जगण्या पेक्षा लढू जगा समाज्याला व्यक्ती मेल्या नंतर किंमत कळते. सामाजिक दायित्वातुन माणसाने माणसाशी माणुसकीने वागा . चौकट : एकता युवा मंचच्या कार्यकर्त्यानी शिवरायाच्या जयंतीनिमित्ताने शिवरायांना डोक्यावर घेण्यापेक्षा त्यांचे आचार – विचार युवकांनी डोक्यात घ्यावा म्हणून प्रबोधनाचा मार्ग निवडल्याने त्यांचे कौतुक होत आहे .
Post Views: 249
