सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत
‘उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग’ याविषयावर राष्ट्रीय चर्चासत्र
सात्रळ । झुंझार न्यूज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उद्यापासून दोन दिवशीय म्हणजे ११ व १२ मार्च रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन सात्रळ महाविद्यालयात करण्यात आले आहे. ‘उच्च शिक्षणातील महिलांचा सहभाग’ या आशयसूत्राला अनुषंगून अभ्यासक आपले निष्कर्ष नोंदवणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांनी दिली.
परिसंवादांमध्ये उच्च शिक्षणातील चर्चालैंगिक समता, महिलांसाठी उच्च शिक्षणाची उपलब्धता, महिलांच्या प्रवेशातील अडथळे, महिलांचे सातत्य व शैक्षणिक यश, विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील महिला, शैक्षणिक क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व, सुरक्षित व समावेशक कॅम्पस वातावरण, महिलांच्या शिक्षणासाठी शासकीय धोरणे, महिलांसाठी आर्थिक सहाय्य व शिष्यवृत्ती, डिजिटल साक्षरता व ऑनलाइन शिक्षण, कौशल्य विकास व रोजगार क्षमता, महिला संशोधकांसाठी काम व वैयक्तिक जीवन संतुलन, संशोधन व नवोन्मेषातील महिलांचा सहभाग, संस्थांमध्ये लैंगिक संवेदनशीलता, महिलांच्या शिक्षणात कुटुंब व समाजाची भूमिका, महिला उद्योजकता व उच्च शिक्षण, महिलांसाठी मार्गदर्शन व सहाय्य व्यवस्था, ग्रामीण महिलांसाठी उच्च शिक्षणाच्या संधी, शिक्षणाद्वारे महिला सक्षमीकरण, महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी भविष्यातील धोरणे या विषयाच्या अनुषंगाने अभ्यासकांनी लिहिलेल्या ६६ शोधनिबंधाच्या पुस्तिकेचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती राष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयक व उपप्राचार्या डॉ.जयश्री सिनगर यांनी दिली.
चर्चासत्रास अभ्यासक, संशोधक, वाचक आणि महिला सबलीकरण कक्षाच्या सर्व बंधू-भगिनींनी उपस्थित राहण्याचे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य व मुख्य संयोजक डॉ. सोपान शिंगोटे, राष्ट्रीय चर्चासत्राच्या समन्वयक व उपप्राचार्या डॉ. जयश्री रामराव सिनगर, डॉ. (प्रो.) रामदास बोरसे, डॉ. भाऊसाहेब नवले, प्रा. दिनकर घाणे, डॉ. रोहिदास भडकवाड, प्रा. सोमनाथ बोरुडे, प्रो. (डॉ.) अनंत केदारे, प्रा. एस. पी. कडू, कार्यालयीन अधीक्षक ॲड. श्री. अनिल गागरे व श्री. महिंद्र तांबे यांनी केली आहे.