अधिकाऱ्याला मारहाण झाल्याच्या निषेधार्थ व्यक्त केला संताप
संगमनेर । झुंझार न्यूज
संगमनेर पंचायत समिती मधील सी आर पी महिला बचत गटाचे समुदाय संसाधन अभियान व्यवस्थापकांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यां सह सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामबंद आंदोलन करत निषेध व्यक्त केला
संगमनेर पंचायत समितीतील सी आरपी विभागातील समुदाय संसाधन अभियान व्यवस्थापक नंदलाल पोपट कोकाटे यांच्यावरती काँग्रेसचे जिल्हा परिषदेचे भावी उमेदवार शरद नाना थोरात, त्यांचा मुलगा, पुतण्या यांच्या सह इतर ८ ते १० जणांनी कोकाटे यांच्या कार्यालयात घुसून फिल्मी स्टाईलने मारहाण केली आहे या मारहाणीत कोकाटे हे जखमी झाले असून. त्यांच्यावरती लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.या घटनेचा सर्वच विभागा तील अधिकार्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला .
बुधवारपासून काळ्या फिती लावून काम काज करण्याचा निर्णयही सर्वच विभागातील अधिका ऱ्यांनी घेतला आहे. या त्यांच्यावरती लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालया मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे