संगमनेर । झुंझार न्यूज

 

राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या निमगाव जाळी चे लोकनियुक्त सरपंच प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या विरोधात अतिक्रमणाचे दाखल केलेले अपील नाशिक आयुक्त कार्यालयाने फेटाळून लावले आहे.

             

आश्वी जिल्हा परिषद गटामधील सर्वात मोठी निमगावजाळी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायत ची निवडणूक सन २०२२-२०२३ मध्ये पार पडली होती. या निवडणुकीत लोकनियुक्त सरपंच महणून सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे हया प्रचंड बहुमताने निवडून आल्या आहेत. सरपंच सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांनी निमगाव जाळी गावातील तुळजाभवानी दुध संस्थेने अतिक्रमण केले आहे अशी तक्रार सदस्य सुरेश दगडू डेंगळे याने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांचेकडे अर्ज क्र. ८२/२०२३ अपील दाखल केले होते.

           

 

अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी दि.२०/०१/२०२५ रोजी सरपंच सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांच्या बाजूने निकाल देऊन सुरेश डेंगळे याचा अर्ज नामंजूर करून अपील फेटाळले होते. त्यानंतर सुरेश डेंगळे याने अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांच्या निर्णयाचे विरोधात नाशिक अप्पर विभागीय आयुक्तांकडे ग्रामपंचायत अपील क्र. २९/२०२५ दाखल केले होते. तक्रारदार सुरेश डेंगळे अप्पर विभागीय आयुक्तांपुढे निमगाव जाळी येथील तुळजाभवानी सह दुध उत्पादक संस्था संगमनेर लोणी रोड कडून निमगाव जाळी कडे येणाऱ्या गावठाण रोड च्या बाजूला असलेल्या सरकारी जागेमध्ये ग्रामपंचायत ची कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता अनधिकृतरित्या संस्थेचे बांधकाम केले आहे. आणि संस्थेची संस्थापक संचालक प्रतिभा सोमनाथ जोंधळे असल्याने त्यांना सरपंच पदावरून हटवण्यात यावे अशी तक्रारीत म्हटले होते.

       

परंतु सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांनी संस्थेची सर्व कागदपत्रांची पूर्तता असल्याचे विभागीय अप्पर आयुक्त यांना पुराव्यानिशी सादर करून विभागीय अप्पर आयुक्त अजय मोरे यांनी दोन्ही बाजूचा व्यक्तिवाद एकूण घेऊन तक्रारदार ह्याच्या म्हणण्यानुसार सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांनी ग्रामपंचायतीचे मिळकतीत अतिक्रमण केले असलेबाबत ग्रामपंचायत रेकॉर्डवर तशी नोंद नाही. तसेच प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांनी अतिक्रमण केले बाबत तक्रारदार याने सबळ पुराव्यानिशी शिध्द करू शकले नाही. त्यामुळे सुरेश डेंगळे याचे अपील नामंजूर करून अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी अपील क्र. ८२/२०२३ मधील दि. २०/०१/२०२५ रोजी पारित केलेला आदेश कायम करण्यात येत आहे असा निर्णय देऊन तक्रारदार याचा अपील फेटाळले आहे.
       

यावेळी सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांचे वतीने वकील अॅड. दत्तात्रय तिडके यांनी जोरदार व्यक्तिवाद करून अप्पर विभागीय अप्पर आयुक्त यांचे आदेशाने सौ प्रतिभा सोमनाथ जोंधळे यांचे सरपंच पद कायम राहिले आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *