{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

आमदार अमोल खताळ यांची माहिती

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

 

केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या नमो किसान सन्‍मान योजनेच्या आठव्या हप्त्याचे अनुदान संगमनेर तालुक्यातील५८हजार ४८६ शेतक-यांना मंजूर झाले असून अनूदानापोटी ११ कोटी ६९ लाख रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग झाले असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली शेतक-यांसाठी महायुती सरकारने सुरु केलेली नमो किसान सन्मान योजना ही एक ऐतिहासिक योजना ठरलीआहे. केंद्र सरकारचे शेतकरी सन्मान योजनेचे वर्षाला ६ हजार रुपये आणि राज्य सरकारच्या नमो किसान सन्मान योजनेचे ६ हजार रुपये असे एकूण १२ हजार रूपयांचे अनुदान शेतकर्यां च्या थेट बॅक खात्यात वर्ग होत असल्‍याने दोन्ही योजनांचा मोठा दिलासा शेतक-यांना मिळत आहे

संकटाच्या काळात महायुती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून विविध योजना तसेच नैसर्गिक संकटात शेतकर्यांना या सरकारने मदत उपलब्ध करून दिली असल्याचे आमदार खताळ यांनी सांगितले

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *