{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

ठेवीदारांचा वाढता विश्वास आणि पारदर्शक कारभारामुळे एकूण व्यवसाय २८९ कोटींच्या पार

लवकरच स्वमालकीच्या भव्य इमारतीत मुख्य कार्यालय स्थलांतरित होणार

 

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

सहकार क्षेत्रात आपल्या पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभाराचा ठसा उमटविणाऱ्या संगमनेर येथील संग्राम नागरी सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात नेत्रदीपक कामगिरी केली आहे. सर्व तरतुदी वजा जाता संस्थेला ३ कोटी ४१ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला असून, संस्थेच्या या आर्थिक भरारीमुळे सभासद आणि ठेवीदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे, अशी माहिती संस्थेचे चेअरमन श्री. राणीप्रसाद मुंदडा यांनी दिली.

Oplus_131072

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या शिस्तीत आणि माजी महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संग्राम पतसंस्थेची प्रगती सुरू आहे. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे आणि आ. सत्यजित तांबे यांच्या समर्थ नेतृत्वामुळे संस्थेने सातत्याने आपला प्रगतीचा आलेख उंचावत ठेवला आहे.

 

आर्थिक स्थितीचे भक्कम वास्तव

संस्थेच्या आर्थिक प्रगतीचा आढावा घेताना चेअरमन मुंदडा यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षात संस्थेचे वसूल भागभांडवल १ कोटी ८७ लाख रुपयांवर पोहोचले आहे. गुंतवणूकदारांच्या विश्वासामुळे संस्थेकडे आजमितीस १५६ कोटी ३५ लाख रुपयांच्या ठेवी जमा आहेत. सुरक्षित गुंतवणूक आणि आकर्षक व्याजदरामुळे नागरिक या संस्थेकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत.

२८९ कोटींचा एकूण व्यवसाय

संस्थेचे व्हाईस चेअरमन इंजि. विजय गिरी यांनी कर्जवाटपाबाबत माहिती देताना सांगितले की, संस्थेने आतापर्यंत १३३ कोटी १ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. यामध्ये ‘सोनेतारण’ कर्जाचे प्रमाण लक्षणीय असून, त्याद्वारे नागरिकांच्या आर्थिक गरजा अत्यंत जलद आणि सुलभ पद्धतीने पूर्ण केल्या जात आहेत. संस्थेचा स्वनिधी २७ कोटी ६८ लाख रुपये असून, एकूण गुंतवणूक ५५ कोटी ४७ लाखांवर गेली आहे. संस्थेचा एकत्रित व्यवसाय आता २८९ कोटी ३६ लाख रुपयांच्या टप्प्यावर पोहोचला आहे.

NPA वर नियंत्रण आणि आधुनिक सेवा

संस्थेच्या यशाचे गमक सांगताना व्यवस्थापक श्री. उमेश शिंदे म्हणाले की, कर्जवाटप करताना अत्यंत पारदर्शकता पाळली जाते. योग्य वसुली आणि आर्थिक शिस्तीमुळे संस्थेचा एनपीए (थकीत कर्ज) पूर्णपणे नियंत्रणात आहे. आगामी काळात सभासदांना अधिक सक्षम डिजिटल सेवा, जलद व्यवहार प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, संस्थेचे मुख्य कार्यालय लवकरच संस्थेच्या स्वमालकीच्या भव्य इमारतीत स्थलांतरित होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

संस्थेच्या या यशस्वी वाटचालीत संचालक मंडळाचे मोलाचे योगदान लाभले आहे. यामध्ये डॉ. नाजिमुददीन शेख, श्री. विलास दिघे, डॉ. माणिकराव शेवाळे, श्री. सुर्यकांत शिंदे, श्री. नानासाहेब वर्षे, श्री. दत्तात्रय आरोटे, अॅड. प्रशांत गुंजाळ, श्री. श्रीकांत कोकणे, श्री. सुदिप वाकळे, डॉ. सुचित गांधी, श्री. उमेश बोटकर, श्री. सोमेश्वर दिवटे, सौ. सुलभाताई दिघे, सौ. सुनंदाताई दिघे, श्री. अनिल सातपुते, सी. ए. अमित कलंत्री आणि श्री. प्रकाश गुंजाळ यांसह सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी समन्वयित प्रयत्न केले आहेत.

संस्थेच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक होत असून, “सभासदांचा विश्वास हेच आमच्या प्रगतीचे मुख्य सूत्र आहे,” अशी भावना चेअरमन राणीप्रसाद मुंदडा यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *