{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

संगमनेर । झुंझार न्यूज 

 


समतेचा आणि मानवतेचा संदेश देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवाला संगमनेरमध्ये गालबोट लागले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित व्याख्यान आणि पुरस्कार वितरण सोहळा सुरू असताना, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मुद्दामहून डीजेवर व्यक्तिगत आणि उडत्या चालीची गाणी वाजवून कार्यक्रमात गोंधळ घातला. महायुतीच्या या ‘विकृत’ आणि ‘उर्मट’ वृत्तीचा संगमनेर तालुक्यासह आता राज्यभरातून तीव्र निषेध केला जात आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी अभिवादन कार्यक्रम सुरू होते. स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने पुतळा परिसरात व्याख्यान आणि ‘जीवनगौरव’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत शांततेत आणि वैचारिक वातावरणात हा कार्यक्रम सुरू असताना, महायुतीच्या कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी डीजे आणला. या डीजेवर भीमगीतांऐवजी व्यक्तिगत प्रतिमा उंचावणारी आणि उडत्या चालीची अशोभनीय गाणी मोठ्या आवाजात लावण्यात आली

कार्यक्रमात वारंवार अडथळा येत असल्याने व्यासपीठावर उपस्थित असलेले आमदार सत्यजित तांबे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला. “आम्ही गेल्या ४० वर्षांपासून सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन जयंती साजरी करत आहोत, मात्र असे वर्तन कधीच घडले नव्हते. पोलीस प्रशासन काय करत आहे? महामानवाच्या विचारांचा जागर सुरू असताना जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करा,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. तांबे यांच्या सूचनेनंतर महसूल आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

प्रशासनाने हस्तक्षेप केल्यावर काही वेळ डीजे बंद झाला, मात्र पुन्हा तो सुरू करण्यात आला. यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या उत्कर्षाताई रुपवते आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुमताई माघाडे या स्वतः डीजे लावलेल्या ठिकाणी पोहोचल्या. त्यांनी कार्यकर्त्यांना जाब विचारला असता, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी या ज्येष्ठ महिला कार्यकर्त्यांशी अत्यंत उद्धटपणे वर्तन केले. यामुळे उपस्थित जनसमुदाय आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आक्रमक झाले. काही काळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला होता.


या गोंधळामुळे संगमनेरमधील मुख्य रस्ते ट्रॅफिक जाम झाले होते. वाढता तणाव पाहून पोलीस आणि महसूल प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट असून, “हा प्रकार म्हणजे म्हातारी मेल्याचे दुःख नाही, तर काळ सोकावतोय,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.


सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले आहेत. महामानवाच्या जयंती दिनी अशा प्रकारे वैयक्तिक प्रसिद्धीसाठी कार्यक्रमात धुडगूस घालणे ही राजकीय विकृती असल्याची टीका विविध स्तरांतून होत आहे. संगमनेरमधील या घटनेने महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या कार्यपद्धतीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *