व्यंगचित्रकार हा समाजातील उणीवांवर आपल्या कुंचल्यातून व्यक्त होत असतो. मात्र व्यक्त होताना समाजाचा समतोल बिघडणार नाही, हानी किंवा द्वेष पसराला जाणार नाही यांची दक्षता व्यंगचित्रंकरानी घेतली पाहिजे. आजच्या धकाधकीच्या जीवनात हास्य महत्वाचे आहे. तणावमुक्त होण्यासाठी प्रत्येकाने एक तरी व्यंगचित्र रोज पाहिले पाहिजे,वाचले पाहिजे ” असे मत प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले आहे.
” कलाकार हा एका रात्रीतून तयार होत नाही,त्याच्यामागे असते कलेची साधना, जिद्द,चिकाटीने कला जोपासत तो यश संपादन करतो, मी चित्रकला शिकलो ते स्वतःवर असलेला आत्मविश्वास आणि सतत केलेले स्केचिंग. ” असे उदगार आनंद गायकवाड यांनी काढले.
आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सव पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे सुरु आहे. या महोत्सवात देश,विदेशातील व्यंगचित्रकारांनी सहभाग घेतला आहे. या महोत्सवात प्रसिद्ध व्यंगचित्रकार अरविंद गाडेकर यांनी काढलेल्या व्यंगचित्राची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार शेख ईद्रीस, आसिफअली सय्यद आणि संगमनेर येथील नागरिकांनी केला आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक कार्यविभागातर्गत पीएम व्हिजन टू आर्टस्पर्धेत आनंद गायकवाड यांनी काढलेल्या ‘बेटी बचाव, बेटी पढाव ‘याविषयावरील चित्राचा समावेश करण्यात आला त्याबद्दल त्यांचा सांस्कृतिक कार्यमंत्री अडव्होकेट आशिष शेलार, सुलेखानाकर पद्मश्री अच्युत पालव व व्यवस्थापकीय संचालक स्वाती हासे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याबद्दल आनंद गायकवाड यांचा संगमनेर नगरीत सत्कार करण्यात आला.
यावेळी या सत्कार कार्यक्रमाचे आयोजक शेख ईदरीस, असिफअली सय्यद हे होते.या वेळी डॉ.जी.पी.शेख, डॉ.सुधाकर पेटकर, ज्ञानेश्वर गोंटे, मुकुंद डांगे, रमेशकाका सराफ, बाळकृष्ण महाजन, ज्ञानेश्वर राक्षे,लक्ष्मण ढोले, लहानू सदगीर,सुरेश परदेशी, राजेंद्र वेल्हाळ यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच या सत्कार कार्यक्रमास रि.ना.तहसिलदार अनिल सोमणी हे उपस्थित होते.
५ मे व्यंगचित्रकार दिन जगभर मोठया उत्साहाने साजरा होत आहे. यानिमित्त व्यंगचित्र प्रदर्शन, प्रात्यक्षिक आणि व्याख्यान आयोजित करण्यात येत आहेत.