संगमनेर : झुंजार न्यूज संगमनेर तालुक्यातील पिंप्री लौकी अजमपुर गावातील गांवा अंतर्गत पिरबाबा मळा येथील दराडी , लावरे , राहींज , दातीर वस्ती वरी रस्ता मजबुती करण कामासाठी शिर्डी विधान सभा मतदार संघाचे भाग्य विद्याते राज्याचे महसूलमंत्री मा . ना राधाकृष्ण विखे पा साहेब याच्या विशेष प्रयत्नानी आमदार निधीतील रस्याच्या कामांचा शुंभारभ झाला . याप्रसंगी भा ज पा सरचिटणीस भारतराव गिते , अश्वीनी पतसंस्थेचे संचालक भाऊसाहेब पा लावरे , शैम्प्रोचे संचालक भिमाजी पा राहींज , उपसरपंच दौलत दातीर , विकास सोसायटी चेअरमन सिताराम पा दातीर , प्रवरा माध्य विद्यालयाचे अध्यक्ष भाऊसाहेब मुंढे , लक्ष्मणराव गिते , रामदास पा दातीर , इंजि भाऊसाहे ब दराडी , ग्राम सदस्य चांगदेव कदम , डॉ रविंद्र दराडी , जनार्धन दातीर , किरण राहींज , कॉन्ट्रक्टर इनामके आदिसह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होत . यावेळी भारतराव गीते म्हणाले की , शिर्डी विधानसभा मतदार संघाचे गतिमान नेतृत्व व राज्याचे महसूलमंत्री ना . राधाकृष्ण विखे पा यांच्या निधीतुन मंजुर झालेल्या रस्त्याच्या कामामुळे गाव व गावांर्तग निश्चीतचं दळण वळणाचा प्रश्न सुटणार असुन गावच्या विकासाचा आलेख वाढणार आहे . विखे पाटील यांनी गावच्या विकासाठी खुप मोठा निधी दिला असुन येत्या काही दिवसात या गावाची आदर्श गाव म्हणुन ओळख निर्माण करण्यासाठी ग्रामस्थांनी राजकारणाचे जोडे बाजुला ठेवुन आप आपसातील मतभेद हेवेदावे बाजुला ठेवुन गाव म्हणजे आपले कुटुंब समजुन मदत करावी अशी अपेक्षा भारतराव गिते यांनी शेवटी व्यक्त केली .
