संगमनेर : झुंजार न्यूज राज्य शासनाच्या प्रसिद्धी योजनेच्या जाहिराती लघुसंवर्गातील वृत्तपत्रांना मिळाव्यात यासाठी राज्यातील विविध दैनिकांच्या संपादकांच्या शिष्टमंडळाने मुंबईत माहिती संचालक जयश्री भोज यांची भेट घेऊन निवेदन दिले.
’निर्णय वेगवान महाराष्ट्र गतिमान‘ या प्रसिद्धी योजनेच्या जाहीराती लघु संवर्गातील वृत्तपत्रांना मिळाव्यात म्हणून महाराष्ट्रातील संपादक शिष्टमंडळाने माहिती महासंचालक जयश्री भोज यांची भेट घेतली. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबई व प्रेस कौन्सील ऑफ महाराष्ट्र, मुंबई या संस्थांच्यावतीने जाहिरात मिळण्यासंबधीचे निवेदन माहिती संचालक जयश्री भोज यांना यावेळी या शिष्टमंडळाने दिले यावेळी संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र, मुंबईचे अध्यक्ष तथा दैनिक युवावार्ताचे संस्थापक किसन भाऊ हासे, दैनिक तुफान लोकशाहीचे संपादक इलियास खान, संपादक बी. डी. गायकवाड, संपादक बाबा रामटेके, संपादक वाघमारे, दैनिक युवावार्ताचे मुंबई प्रतिनिधी राजाभाऊ कांदळकर व प्रेस फोटोग्राफर प्रसाद सुतार उपस्थित होते.
