या सर्वांच्या पेन्शनचा विचार करता ही रक्कम शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या हमीभावासाठी खर्च झाली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाहीत. अस्मानी व सुलतानी संकटांनी पिडलेले शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, आजवर त्यांनी अनेकदा हमीभावासाठी आवाज उठवला असूनही सरकारने ही मागणी गांभीर्याने घेतली नाही. पूर्ण दाबाने व दिवसा विजपुरवठा होत नसूनही, विजबिल न भरल्यास विजवितरण कंपनी रोहीत्र बंद करते. शेतमालाचे बाजारभाव कोसळल्याने उभ्या पिकात नांगर फिरवला जात आहे.
अशा परिस्थितीत मुळात भरभक्कम वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळणारी हजारो लाखो रुपयांची पेन्शन कमी करुन, उपलब्ध पैशांचा विनियोग शेतमालाच्या हमीभावासाठी करण्याची मागणी पठार भागातील घारगाव पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे. याच्या प्रती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते अजीत पवार, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, ज्येष्ठ नेते शरद पवार, जिल्हाधिकारी, संगमनेरचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना पाठवल्या आहेत. निवेदनावर महेश आहेर, मंगेश कान्होरे, सुरेश आहेर, किशोर डोके,सुरेश आहेर,नंदू कान्होरे, सतिश आहेर, अजित आहेर, प्रभाकर शेळके, मुसाभाई शेख, रामदास आहेर, बाळासाहेब ढोले, आदींसह ५५ शेतकऱ्यांच्या सह्या आहेत
