लोणी । झुंझार न्यूज

 


समाजहित आणि गरिबांची सेवा हेच ब्रीदवाक्य मानून काम करणाऱ्या ‘टायगर ग्रुप’च्या वतीने लोणी येथे एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. टायगर ग्रुप लोणीचे अध्यक्ष पै. आण्णा ब्राम्हणे यांच्या वाढदिवसानिमित्त गुहा येथील श्री गंगाधर बाबा छात्रालय व अनाथ आश्रम येथे सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनाथ मुलांना अन्नदान आणि शालेय साहित्याचे वाटप करून वाढदिवस अत्यंत साध्या व समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.

१०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात


वाढदिवसाचे औचित्य साधून आश्रमातील सुमारे १०० विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल आणि स्कूल बॅग यांसह इतर आवश्यक शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. साहित्याचे वाटप होत असताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमललेले हास्य उपस्थितांचे मन जिंकून घेणारे होते. साहित्य वाटपानंतर सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आले. भपकेबाजपणाला फाटा देऊन सामाजिक बांधिलकी जपणारा हा उपक्रम परिसरातील नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.

सामाजिक कार्याचा आदर्श: पप्पू सपकाळ


कार्यक्रमादरम्यान आपले मनोगत व्यक्त करताना आश्रमाचे संचालक पप्पू सपकाळ म्हणाले की, “टायगर ग्रुपच्या माध्यमातून या आश्रमात नेहमीच मदतीचा ओघ सुरू असतो. तान्हाजी भाऊ जाधव आणि त्यांचे सर्व सहकारी आश्रमातील मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात. अशा उपक्रमांमुळे अनाथ मुलांना केवळ वस्तूच मिळत नाहीत, तर त्यांना समाजाचा आधार असल्याचे जाणवते.”

गरजूंसोबत आनंद साजरा करणे हीच खरी सेवा: बंटी भाऊ भिंगारदिवे


यावेळी टायगर ग्रुपचे जिल्हाध्यक्ष पै. बंटी भाऊ भिंगारदिवे यांनी तरुणांना सामाजिक कार्याचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “प्रत्येकाने आपले वाढदिवस, उत्सव आणि आनंदाचे क्षण समाजातील वंचितांसोबत आणि गरजूंसोबत साजरे केले पाहिजेत. हीच खरी समाजसेवा आहे आणि टायगर ग्रुप नेहमीच या विचाराने कार्य करत राहील.”

या कार्यक्रमाला टायगर ग्रुपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये सागर भिंगारदिवे, सुहास ब्राम्हणे, बाळा कुटे, धनु चव्हाण, विजय साबळे, मछिंद्र दराडे, अनिकेत खरात, विजय भोसले, महिंद्रा खरात, वैभव शेलार, मुरली पवार, सिद्धार्थ खरात, महेश खरात, करण गायकवाड, प्रतीक सोनवणे, मयूर वाघमारे, प्रणव कादंळकर, साईजीत बोर्डे, धिरज चितळे, यश क्षिरसागर, सोनू चोखर, तुषार सिनारे, आकाश कुऱ्हे आदींचा समावेश होता.

कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी केले होते. या सामाजिक उपक्रमामुळे पै. आण्णा ब्राम्हणे यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *