आश्वी । झुंझार न्यूज
महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोरे यांनी पाचव्यांदा आमदारकीची शपथ घेऊन एक नवा इतिहास रचला आहे. सलग पाचव्यांदा पक्षाने दाखवलेला विश्वास आणि जनसेवेची ओढ यामुळे हा बहुमान मिळाल्याची भावना व्यक्त करत, डॉ. गोरे यांनी प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणरायाचे दर्शन घेतले आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतले.
सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर डॉ. नीलम गोरे यांनी तातडीने सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो माझ्यासाठी मोलाचा आहे. जनतेचे प्रेम आणि आशीर्वादाच्या जोरावरच मी इथपर्यंत पोहोचले आहे. इथून पुढची वाटचाल ही अधिक जोमाने जनसेवेच्या भावनेतून आणि गणरायाच्या कृपेने पूर्ण करण्याचा माझा संकल्प आहे.”

या विशेष प्रसंगी शिवसेनेच्या संपर्कप्रमुख सुरेखाताई गव्हाणे यांनी डॉ. नीलम गोरे यांचे आगळेवेगळे स्वागत केले. त्यांनी डॉ. गोरे यांना पवित्र ‘ज्ञानेश्वरी’ ग्रंथ भेट दिला. केवळ सत्कार करून न थांबता, सुरेखाताई गव्हाणे यांनी या निमित्ताने ‘एक लाख वाचक’ घडवण्याचा संकल्प जाहीर केला. आध्यात्मिक मूल्ये आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जेहलम जोशी, शिवसेना उपनेत्या कला शिंदे, रंजना कुलकर्णी (संपर्क प्रमुख लातूर), सुरेखा गव्हाणे (शिर्डी लोकसभा महिला आघाडी संपर्क प्रमुख), संगीता सहकारी (बीड), पूजा रावेतकर (संपर्क प्रमुख पुणे), सविता किवंडे (संपर्क प्रमुख जालना), उज्वला भोपळे (संपर्क प्रमुख परभणी), मीलनी (अहिल्यानगर), राजश्री मांडविलकर (मुंबई विभाग प्रमुख), पानमंद, सुनीता वैती, रुची वाडकर, वैशाली, स्वाती राणी, लता पाटील, कीर्ती मेश्राम, वर्षा जाधव आणि शालिनी देशपांडे यांचा समावेश होता.
यासोबतच बारामतीचे सुर जेंद्रे, शिवसेना पुणे शहरचे सुधीर कुरुमकर, झोपडपट्टी शहर प्रमुख राजू विटकर आणि सूर्यवंशी यांसह इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी डॉ. नीलम गोरे यांना शुभेच्छा दिल्या.



