{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"addons":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

 

 

आश्वी । झुंझार न्यूज

संगमनेर तालुक्यातील पानोडी येथील ‘सरदार शिवराव भवानराव थोरात विद्यालयाने’ इयत्ता १० वीच्या बोर्ड परीक्षेत आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा यंदाही मोठ्या थाटात कायम राखली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळवत घवघवीत यश संपादन केले असून, या यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा विद्यालयाच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

विद्यालयाचा निकाल यंदाही उत्कृष्ठ लागला असून, निवेदिता कराड हिने ९३.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम येण्याचा मान पटकावला. कल्याणी परशराम जाधव (८७.४०%) हिने द्वितीय, तर अक्षदा शाम पाबळ (८६.८०%) हिने तृतीय क्रमांक मिळवला. याशिवाय मंगेश शिवाजी खेडकर (८५.६०%) आणि पायल श्रीराम थोरात (७७.४०%) यांनी अनुक्रमे चतुर्थ व पाचवा क्रमांक पटकावत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

केवळ विद्यार्थीच नव्हे, तर त्यांच्या यशात मोलाचा वाटा असलेल्या पालकांचाही सन्मान करण्याचे औचित्य विद्यालयाने साधले. पहिल्या पाच क्रमांकाच्या विद्यार्थ्यांचा त्यांच्या पालकांसह जाहीर सत्कार करण्यात आला. ग्रामीण भागातील मुलांनी मिळवलेल्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.


या गौरव सोहळ्याप्रसंगी राजहंस दूध संघाचे संचालक विक्रम थोरात, विद्यालयाचे अध्यक्ष विनायकराव थोरात, सोसायटीचे चेअरमन बबनराव कराड, भारत शेवाळे, हौशाभाऊ जाधव, मुख्याध्यापक पोपट सोनवणे आणि पत्रकार राजेश गायकवाड आदि मान्यवर उपस्थित होते.


यावेळी बोलताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या कष्टाचे आणि शिक्षकांच्या मार्गदर्शनाचे कौतुक केले. मुख्याध्यापक पोपट सोनवणे यांनी विद्यालयाच्या सातत्यपूर्ण यशाचा आलेख मांडला आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *