{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजवर निवड

 



संगमनेर । झुंझार न्यूज

 

अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाच्या सन २०२५-२०२६ या शैक्षणिक वर्षात १०८ वि‌द्यार्थ्यांची विविध नामांकित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली. या कंपन्यांमध्ये निवड झालेल्या वि‌द्यार्थ्यांना तीन लाखापासून ते सात लाखापर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. अशी माहिती अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालयाचे संचालक डॉ. बी. एम. लोंढे यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या नोकरी बाबत अधिक माहिती देताना डॉ.लोंढे म्हणाले की, माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कार्यकारी विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालया‌द्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या करिअर जडणघडणीमध्ये नेहमीच मोलाचा वाटा उचललेला आहे. आत्तापर्यंत महाविद्यालयातून २५४१ वि‌द्यार्थ्यांनी एमबीए पदवी संपादित केलेली असून अशा या एमबीए महाविद्यालयाची स्थापना दूरदृष्टी नेतृत्व असलेले सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या संकल्पनेमधून १९९४-१९९५ मध्ये झाली त्यानंतर  महावि‌द्यालयात दरवर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्लेसमेंट, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेमिनार कॉन्फरन्सेस चे आयोजन, आणि नवीन उ‌द्योजक घडविण्याचे कार्य केले आहे.

अमृतवाहिनी एमबीए महावि‌द्यालय हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी कायम संलग्नित असून महाविद्यालयाने सर्वच क्षेत्रात उच्च निकालाची परंपरा राखलेली आहे तसेच महावि‌द्यालयाने आय. एस. ओ. मानांकन प्राप्त केलेले असून इ.स. सन २०२४ मध्ये महावि‌द्यालयाने युजीसी चे NAAC चे “ए” ग्रेड मानांकन मिळवलेले आहे. महावि‌द्यालयास पुणे विद्यापीठ अंतर्गत व्यवस्थापन शास्त्रातील संशोधन केंद्रास मान्यता मिळालेली आहे. अशा या ग्रामीण भागातील महावि‌द्यालयात अनुभवी व उच्चवि‌द्याविभूषित प्राध्यापक वर्ग कार्यरत आहे. त्यापैकी दहा प्राध्यापकांनी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी मधून पीएचडी पदवी संपादन केलेली असुन संशोधन केंद्रात पीएचडी चे मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रात ३६ संशोधक विद्यार्थी पीएचडीचे शिक्षण घेत आहेत.

अमृतवाहिनी एम बी ए महाविद्यालय पुणे नाशिक हायवे जवळ स्वतंत्र कॅम्पस मध्ये वसलेले आहे महाविद्यालयात शैक्षणिक दृष्ट्या आवश्यक असलेल्या सर्व सुविधा त्यामध्ये स्वतंत्र इमारत, ग्रंथालय, क्रीडांगण, प्लेसमेंट कक्ष, संगणक विभाग, होस्टेल व मेस सुविधा आणि ग्रीन कॅम्पस इत्यादी सुविधा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत.

या निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कंपन्यांमध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, इंडियामार्ट इंटरमेश लिमिटेड, कोटक महिंद्रा बँक, डी-मार्ट, सोलर स्क्वेअर एनर्जी प्रा. लि., केएसबी लिमिटेड, एमफेसिस लिमिटेड, महिंद्रा कॉर्नरस्टोन ऑटोमोबाईल्स, टाटा रॅलिस इंडिया लिमिटेड, मणप्पुरमफायनान्स लि., आज सप्लाय चेन मॅनेजमेंट प्रा. लि., बन्सल वायर इंडस्ट्रीज लि., हाऊसी की मॅन्शन्स प्रा. लि., ऊर्जा फूड्स अँड अॅग्रो प्रा. लि., फ्लेअर्स एनर्जी एलएलपी, स्नेह प्रीकास्ट अँड कॉन्स्टो सोल्युशन्स प्रा. लि., वाणी टेक्नॉलॉजीज प्रा. लि., पी९९सॉफ्ट प्रा. लि., सह्याद्री अॅग्रोव्हेट अशा विविध नामांकित कंपन्यांमध्ये अमृतवाहिनी महावि‌द्यालयाच्या द्वितीय वर्षातील १०८ विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे. ग्रामीण भागातील वि‌द्यार्थ्यांचे जीवनमान जडणघडणीमध्ये एमबीए महावि‌द्यालयाने नेहमीच मोलाचा वाटा उचललेला आहे. आत्तापर्यंत महाविद्यालयातून २९ बॅचेस नी एमबीए पदवी संपादित केलेली आहे. त्यातील बहुतांश विद्यार्थी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्पोरेट क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे.

अमृतवाहिनी एमबीए मध्ये केवळ पाठ्यक्रम अभ्यासक्रम न शिकवता विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख शिक्षण देऊन रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात व त्याचप्रमाणे उ‌द्योजक सुद्धा निर्माण करण्याचे कार्य केले जाते. या सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्लेटमेंटसाठी अमृतवाहिनी एमबीएच्या वतीने संचालक डॉ.बी. एम. लोंढे, प्लेसमेंट विभाग प्रमुख डॉ. आर.बी. गवळी व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी प्रयत्न केले.

या सर्व निवड झालेल्या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे माजी महसूल मंत्री अध्यक्ष बाळासाहेब थोरात, मा.आ. डॉ. सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ. शरयु देशमुख, साखर कारखान्याचे संचालक  इंद्रजीत भाऊ थोरात, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा.व्ही.बी. धुमाळ आणि संस्थेचे डायरेक्टर अकॅडेमिक डॉ.जे.बी. गुरव, डॉ. एम बी लोंढे यांनी अभिनंदन केले आहे.

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *