कोपरगांव । झुंझार न्यूज

कोपरगांव तालुक्यातील खिर्डीगणेश येथील आकांक्षा विक्रम भास्कर हिची भारतीय नौदलात उप लेफटनंटपदी नुकतीच निवड झाली. ग्रामिण भागात राहुन बाळगलेली जिदद आणि त्याच्या जोडीला कष्ट यातुन तीने स्वतः सह आईवडीलांच्या स्वप्नांना गवसणी घातली आहे. शेतक-याच्या मुलींने मिळविलेले यश त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.

कुमारी आकांक्षा भास्कर ही लहानपणांपासुनच हुशार होती शारदा इंग्लिश मिडीयम स्कुल मध्ये तीचे दहावीपर्यंतचे शिक्षण झाले त्यात तिने ८८.२० टक्के गुण मिळविले त्यानंतर सद्‌गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयात बारावी परिक्षेत ९१.६५ टक्के गुण मिळवत ती तालुक्यात अव्वल गुणवत्तेत उत्तीर्ण झाली होती त्यानंतर तिने संजीवनी इंजिनियरींग कॉलेज बी. टेक मेकॅनिकल अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत शिक्षण पुर्ण केले. तैवान मध्ये सहा महिने तीने इंटरशिप पुर्ण केली. सध्या ती आता बंगळुर येथे टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत काम करत असतांना तिने भारतीय नौदलाच्या परिक्षेची स्वतःच तयारी केली. संजीवनी सैनिकी स्कुलचे विजय भास्कर यांनी तिला या परिक्षेचे सर्व मार्गदर्शन केले. कोलकाता येथे देशभरातुन ७७ मुली या परिक्षेसाठी होत्या, द्वितीय फेरीत ३३ मुली पात्र ठरल्या तर अंतिम गुणवत्ता यादीत ६ मुलींची निवड झाली त्यात आकांक्षा भास्कर हिचा समावेश आहे त्याबददल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. देशासाठी सेवा करून आई वडीलांसह, गावाचा, तालुक्याचा नांवलौकीक वाढवायचा हे तिचे स्वप्न आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या रासायनिक विभागाचे कर्मचारी बाळासाहेब भास्कर यांची ती पुतणी आहे.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *