संगमनेर । झुंझार न्यूज 

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील मेकॅनिकल विभागातील प्रा. योगेश रामराव गुंजाळ यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी एक्सपिरिमेंटल इन्वेस्टीगेशन इन टू असिस्टंट हीटिंग अंड कूलिंग अप्रोच या विषयात पीएचडी प्रदान केली आहे.

 डॉ. प्रा. योगेश रामराव गुंजाळ यांनी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, ‎अहिल्यानगर_ येथील यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील संशोधन केंद्रात करण्यात आले ‎असून, या संशोधनासाठी त्यांना डॉ. विजय शिवाजीराव गडाख यांचे मार्गदर्शन लाभले.‎

डॉ. प्रा. योगेश गुंजाळ हे अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, संगमनेर चे उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील गुंजाळ यांचे नातू आहेत. त्यांच्या संशोधनामुळे ऑटोमोबाईल उद्योगात वजन कमी करणे, वाहनांची मायलेज वाढवणे तसेच मजबूत व टिकाऊ जोड तयार करणे यासाठी मोठी मदत होणार आहे. या संशोधनाच्या माध्यमातून प्रा. डॉ. श्री. गुंजाळ यांनी २ एससीआय दर्जाचे संशोधन लेख, २ आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये संशोधनपत्रे सादर केली आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय संशोधन कार्यामुळे औद्योगिक क्षेत्रात नवे तंत्रज्ञान विकसित होण्यास चालना मिळणार आहे.

त्यांच्या या यशाबद्दल माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात मा. आ. सुधीर तांबे आ. सत्यजित तांबे,  मा. रणजितसिंह देशमुख, विश्वस्त ‎सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे प्रा.  व्ही. बी. धुमाळ ,डॉ. प्रा. जे. बी. गुरव, प्राचार्य ‎ डॉ. एम. ए. वेंकटेश,प्रा. व्ही. पी. वाघे,डॉ. प्रा. आर. आर. नवथर,डॉ. प्रा. एस. एम. मगर, डॉ. प्रा. के. एम. मरकड , डॉ विजय गडाख, संजय कोल्हे व त्यांचे सर्व मित्र परिवार  यांनी त्यांचे अभिनंदन ‎केले आहे.‎

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *