{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":["local"],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":false,"containsFTESticker":false}

 

 

कोपरगांव । झुंझार न्यूज

जिल्हयातील कर्जत तालुक्यातील श्रीक्षेत्र खातगांव येथे समर्थभक्त मोहनबुवा रामदासी यांनी मारूतीची प्रतिष्ठापना करून समर्थ रामदास स्वामी मठाची स्थापना केली तेथील पादुका समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी, दामोदरबुवा रामदासी हे १८ ते २१ मे पर्यंत अधिकमासानिमीत्त कोपरगांवी घेऊन आले असुन त्याचे घरोघर पुजन होत आहे.

         

श्रीक्षेत्र कोकमठाण येथील ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी या परिसरात समर्थ रामदास स्वामीचे प्रसार आणि प्रचाराचे काम सातत्यांने केले. दक्षिणगंगा गोदावरी नदीकाठी तपसाधना करत तीन खणीतुन कुंभमेळा, अधिकमास, नवरात्र, गुरूपौर्णिमा, श्रावणमास, हरिहरभेट यासह प्रत्येक सणवारास ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी अध्यात्माची शिकवण देत परिसराच्या नांवलौकीकात भर घातली आहे. रामदासीबाबा भक्त मंडळ हे कार्य पुढे नेत आहे.

         

समर्थभक्त प्रसादबुवा रामदासी यांनी खातगांव मठातील पादुकांचे तीनखणीत(कोकमठाण) मंगळवारी विधीवत पुजन करतांना सांगितले की, ब्रम्हलिन संत रामदासी महाराज यांनी सज्जनगडावर बारा वर्षे तपसाधना करून संपुर्ण भारतभ्रमण करत धर्म जागृतीसाठी महान कार्य केलेले आहे. तीनखणींत आम्ही ज्या ज्या वेळी येतो त्या त्या वेळी येथुन वेगळीच अध्यात्माची अनुभुतीची उर्जा मिळते. अधिकमास अहंकार, क्रोध, मत्सर सोडण्याची शिकवण देतो. प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा, सत्ता यापेक्षा कोणती कर्मे केली आणि त्यातुन माणसे जोडली हेच समाधान शेवटपर्यंत टिकत असते. सकारात्मक बदलाची शिकवण अधिकमास देतो. मनुष्याच्या हाताने, मनांने चुकीचे कर्म घडले असेल तर भगवान पुरूषोत्तमाच्या कृपेने नष्ट व्हावे यासाठी अंतःकरण शुध्द ठेवा. यात दानाला विशेष महत्व आहे. दामोदरबुवा रामदासी म्हणाले की, कोकमठाणसह कोपरगांववासियांचे भाग्य आहे समर्थांच्या पादुकांचे दर्शन येथे घडते आहे. पादुकांच्या अभा मंडलाची उर्जा सचेतन आहे. समर्थ रामदास स्वामींचा जागर अध्यात्मासह हिंदुत्वाची शिकवण देतो. आज धर्मावर ग्लानी आलेली आहे ती दुर करण्यासाठी प्रत्येकांने या कार्यात सहभागी व्हावे. कोकमठाण अध्यात्म भुमित पादुकांचे जंगी स्वागत करण्यांत आले. विश्वस्थ श्री. दांडेकर महाराज यांनी खातगात समर्थ मठाची कार्याची माहिती दिली. शहरातील गोकर्ण गणेश, दत्तपार, संवत्सर येथील संत रामदासी महाराज वारकरी शिक्षण संस्था विठठल रूक्मीणी, गुरु शुक्राचार्य, कचेश्वर मंदिरात भाविकांच्या सामुहिक पुजन व दर्शनासाठी या पादुका ठेवण्यांत आल्या होत्या. कार्यक्रमाचे पौराहित्य वेदशास्त्र संपन्न सुरेश रंगनाथ जोशी, शाम जोशी, पदे, लुपाटकी गुरूजी यांनी केले. सदरचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रामदासी बाबा भक्त मंडळ कोकमठाण, कोपरगाव ब्राम्हण सभेचे सर्व पदाधिकारी परिश्रम घेत आहेत.

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *