संगमनेर । झुंझार न्यूज

 

अमृतवाहिनीज निडो इंटरनॅशनल स्कूल या अग्रगण्य शैक्षणिक संस्थेने यंदाही आपल्या गुणवत्तेचा ठसा उमटवत इयत्ता दहावी मध्ये शंभर टक्के निकाल मिळवून उत्कृष्टतेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. सातत्य, गुणवत्ता आणि यश यांचा सुरेख संगम साधत शाळेने सलग तिसऱ्यांदा आपली गौरवशाली परंपरा अभिमानाने पुढे नेली असल्याची माहिती प्राचार्य अंजली कन्नावार यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी परिवारासाठी अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे शाळेच्या तिसऱ्या IGCSE (Grade 10) बॅचने यंदाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले  आहे. पदवीधर १७ विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रमाच्या जोरावर एकूण ८ A* आणि ४० A ग्रेड मिळवत शाळेचा गौरव वाढविला आहे. या परीक्षेत दिघे धनेश शिवाजी याने ८७.५७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. त्याने ३ A* व ४ A ग्रेड मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच ICT विषयात ८८ गुण, Biology मध्ये ९१, Chemistry मध्ये ९२ आणि Physics मध्ये ९४ गुण मिळवत विषयातही अव्वल स्थान प्राप्त केले. कासार वृषांक अमित याने ८२ टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक मिळविला. त्याला ५ A आणि २ B ग्रेड प्राप्त झाले. भंडारी माही नितेशकुमार आणि भांगरे आर्यन मधुकर यांनी प्रत्येकी ८१.७१ टक्के गुण मिळवत संयुक्त तृतीय क्रमांक पटकावला. माही हिने १ A*, ४ A, १ B आणि १ C ग्रेड मिळवले, तर आर्यनने १ A*, ३ A आणि ३ B ग्रेड मिळवत उल्लेखनीय यश मिळविले. मिलानी किरीट दिनेश हिने ८१.२९ टक्के गुणांसह चौथा क्रमांक मिळविला. तिने १ A*, ३ A आणि ३ B ग्रेड मिळवले असून हिंदी विषयात ९४ गुणांसह A* ग्रेड प्राप्त करत विषयात अव्वल स्थान पटकावले.

दासरी विवेक कृष्णा याने ८०.१४ टक्के गुणांसह पाचवा क्रमांक मिळविला. त्याने १ A*, ३ A, २ B आणि १ D ग्रेड मिळवले. तसेच इंग्रजी विषयात ८८ गुण आणि गणित विषयात ९० गुण मिळवत विषयात विशेष प्राविण्य मिळविले. याशिवाय सांगळे गौरी सुभाष हिने ICT विषयात ८८ गुण मिळवत विषयात अव्वल यश संपादन केले.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल माजी शिक्षण व महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ. डॉ. सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख , मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डायरेक्टर ऑफ अकॅडमिक डॉ.जे. बी.गुरव ,यांनी विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे व पालकांचे अभिनंदन करून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या प्राचार्य अंजली कन्नावार यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत हे यश संपूर्ण अमृतवाहिनी परिवारासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल अमृतवाहिनी परिवारातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि व्यवस्थापन यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *