संगमनेर । झुंझार न्यूज

 

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या  एमबीए विभागातील विद्यार्थिनी तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनीलभाऊ उकिर्डे यांची कन्या कु. स्नेहल उकिर्डे हिची सिप्ला या नामांकित औषध निर्माण कंपनीमध्ये वार्षिक ८.५ लाख रुपये पॅकेजवर निवड झाली असल्याची माहिती डॉ वृषाली साबळे यांनी दिली आहे.

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज मधील प्लेसमेंट विभागाच्या वतीने विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी समन्वय करण्यात आला असून एमबीए विभागातील स्नेहल सुनील उकिरडे यांची सिपला या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये 8.5 लाख पगाराच्या पॅकेजवर निवड झाली आहे.

स्नेहल उकिरडे ही निळवंडे येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील उकिरडे यांची कन्या आहे.
ती एमबीए HR /Markeking  शाखेची विद्यार्थिनी असून तिच्या या यशामुळे महाविद्यालयासह संगमनेर परिसरात आनंद व्यक्त होत आहे. महाविद्यालयातील प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेत तिने उत्कृष्ट कामगिरी करत हे यश संपादन केले.

स्नेहलच्या यशाबद्दल महाराष्ट्राचे  माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ जयश्रीताई थोरात ,सौ दुर्गाताई तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,बाबा ओहोळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वेंकटेश, एमबीए विभाग प्रमुख डॉ. वृशाली साबळे  डॉ. सचिन खरडे सर,. सचिन गुंजाळ, डॉ. सातव, डॉ. विनोद कुमार पठाडे तसेच प्रा. राशी मॅडम, यांनी स्नेहल उकिर्डे हिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

सातत्यपूर्ण मेहनतीमुळे यश – सुनील उकिरडे

महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण कायम सामाजिक क्षेत्रात काम करत आहोत. ग्रामीण भागात असूनही स्नेहलने ध्येयाने सातत्यपूर्ण मेहनत केली. न्यूनगंड सोडून जिद्द आणि आत्मविश्वासाने तिने यश मिळवले असून तिचा अभिमान आहेच परंतु वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे याचबरोबर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून पूर्ण मेहनत केल्यास नक्की यश मिळेल असा सल्लाही तरुणांना सामाजिक कार्यकर्ते व स्नेहल चे वडील सुनील भाऊ उकिरडे यांनी दिला आहे

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *