पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांनी घेतला नियोजनाचा आढावा

 

 

संगमनेर । झुंझार न्यूज

 

संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे होणाऱ्या स्वामी गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताह व भव्य कृषी महोत्सवाच्या पूर्वतयारीची पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील यांनी भेट देत पाहणी करत सत्तास्थळ येणाऱ्या भाविकांची व्यवस्था आणि कृषी प्रदर्शन स्टॉलच्या नियोजनाचा धावता आढावा घेतला

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ पाटील हे जवळे कडलग येथे कार्यक्रमानिमित्त आले होते कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी गुंजाळवाडी येथे अधिक मासा निमित्त दि ८ जून ते १५ जून २०२६ या कालावधीत होत असणाऱ्या प पु गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्त्ताहस्थळी भेट दिली त्यावेळी सप्ताह कमिटीचे अध्यक्ष दिलीपराव शिंदे तसेच एस. आर. थोरात दूध उद्योग समूहाचे प्रमुख आबासाहेब थोरात यांनी या सप्ताहसाठी येणाऱ्या भाविकांची, निवास व्यवस्था, महा प्रसाद, वाहतूक नियोजन, कृषी प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांची तसेच कृषी महोत्सवाच्या तयारीची सविस्तर माहिती दिली या वेळी सप्ताह कमिटीच्या वतीने पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळ पा यांचा सन्मान करण्यात आला. सप्ताह स्थळी धार्मिक वातावरण निर्माण झाले असून गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यावेळी बन्सी महाराज गुंजाळ महायुतीचे संदीप घुगे जनार्दन आहेर एस आर थोरात दूध उद्योग समूहाचे पृथ्वीराज थोरात पोपट गुंजाळ रोहिदास गुंजाळ युवराज गुंजाळ यांच्यासह गगनगिरी महाराज भक्त मंडळ उपस्थित होते

 

 

राजेश गायकवाड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *